एक्स्प्लोर

Beed: मादळमोही खळबळजनक घटना! उद्योजकाचे अपहरण करुन 2 कोटींची मागणी, चौघांना अटक

Beed: मादळमोही येथील एका व्यवसायिकाचे अज्ञात पाच जणांनी दोन दिवसांपूर्वी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले होते.

Beed: मादळमोही येथील एका व्यवसायिकाचे अज्ञात पाच जणांनी दोन दिवसांपूर्वी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले होते. यावेळी अपहरणकर्त्यांची एक स्कार्पिओ बंद पडल्याने त्यांनी ती तेथील पाटात ढकलून दिली. त्यानंतर अन्य एका स्कार्पिओमधून पोबारा केला. तीन दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेचा चकलांबा पोलिसांनी दोन दिवसांत छडा लावला असून चार आरोपींच्या अहमदनगर येथे मुसक्या आवळल्या. तर या घटनेचा मुख्य सुत्रधार आरोपी अद्याप फरार आहे.

मादळमोही येथील उद्योजक कैलास शिंगटे यांना बुधवारी सायंकाळी पोकलेन भाड्याने लावायचे आहे म्हणून बोलावून घेत त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्कार्पिओने धडक दिली. यावेळी स्कार्पिओतील अपहरणकर्त्यांनी शिंगटे यांना उचलून स्कार्पिओमध्ये टाकले. यानंतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधले. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण करत तब्बल 2 कोटींची मागणी केली. यावेळी 2 कोटी देण्यास नकार दिल्याने दाबणाने त्यांच्या शरीरावर जखमा करुन छळ केला. दरम्यान वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्याजवळ सदरील स्कार्पिओ बंद पडल्याने ती कालव्यात ढकलून दिली. याठिकाणी शिंगटे यांच्या खिशातील त्यांचे व त्यांच्या पत्नीचे आधार कार्ड, पॅन कार्डसह अन्य काही कागदपत्रे फेकली. त्यानंतर अन्य एका स्कार्पिओमध्ये शिंगटे यांना टाकून पुढे नेले. काही अंतरावर गेल्यानंतर आरोपीनंतर शिंगटे यांना चालत्या स्कार्पिओमधून बाहेर फेकले. 

चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना
दरम्यान कालव्यात पडलेली स्कार्पिओ काही जणांच्या निदर्शनास आल्यानंतर याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदरील ठिकाणी शिंगटे यांचे काही कागदपत्रे आढळून आले. त्यानुसार शिंगटे यांच्या कुटूंबांशी संपर्क साधला असता, त्यांची दुचाकी साठेवाडी याठिकाणी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तर काही वेळात शिंगटे यांना त्यांच्या वडिलांना फोन गेल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची आपबीती सांगून मी वडीगोद्रीजवळ असलेल्या एका हॉटेलवर असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांना माहिती देताच त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी शिंगटे यांचा गोंदी पोलिसांनी जवाब नोंदवला गेला. तसेच हे प्रकरण चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दोन दिवसांत पोलिसांनी लावला छडा
अपहरण करण्यात आलेल्या शिंगटे यांना फोन करून बोलविण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी कॉल हिस्ट्री व पाटात ढकलून देण्यात आलेल्या गाडीवरून या घटनेचा तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.दरम्यान, गुन्हा दाखल होताच चकलांबा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन दिवसात छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. काल रात्री अहमदनगर येथून चार जणांना चकलांबा पोलिसांनी अटक केली असून यामधील तीन आरोपी गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील आहेत. तर अन्य एक आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील, सांगवी येथील आहे. 

या घटनेचा मुख्य सुत्रधार अद्याप फरार
दरम्यान या घटनेचा मुख्य सुत्रधार अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आम्ही केवळ मदत केल्याचे सांगितले आहे त्यामुळे मुख्य सुत्रधार अटक झाल्यानंतरच या घटनेचे रहस्य समोर येईल. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 2 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget