एक्स्प्लोर

दागिने लुटून सराफाची हत्या, विहिरीत पडलेला चोर अटकेत

कारने धडक देऊन दुचाकीस्वार सराफ विकास थोरात यांना खाली पाडलं, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला, त्यानंतर दागिने लुटून चोरटे पसार झाले

बीड : एखाद्या चित्रपटातच शोभावा असा थरार बीडमध्ये केज-अंबाजोगाई रस्त्यावर घडला. लुटीच्या उद्देशाने मंगळवारच्या रात्री दोघा चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याला धडक दिली. दागिन्यांसह पळ काढणाऱ्या चोरट्यांचा तरुणांनी पाठलाग सुरु केला. एक चोरटा विहिरीत पडल्यामुळे हाती लागला, तर दुसऱ्याला डोंगरमाळावरुन ताब्यात घेण्यात आलं. दुर्दैवाने या संपूर्ण प्रकरणात कुंबेफळमधील एका निष्पाप तरुण सराफा व्यापाऱ्याचा नाहक बळी गेला. केज तालुक्यातील कुंबेफळमध्ये राहणाऱ्या विकास थोरात यांचं केज शहरात 'कृष्णाई ज्वेलर्स' हे सराफा दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करुन सोनं घेऊन दुचाकीवरुन गावाकडे निघाले होते. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चौघांनी त्यांचा कारमधून पाठलाग सुरु केला. केज-अंबाजोगाई रस्त्यावरील माऊली जिनिंगसमोर थोरात आले असता, चोरट्यांनी आपल्या कारने धडक देऊन थोरात यांना बाईकवरुन खाली पाडलं. या धडकेत विकास थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील चोरट्यांनी त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन धनेगावच्या दिशेने पळ काढला. मयत विकास थोरात मयत विकास थोरात घटनास्थळी उपस्थित असलेल्या अमोल थोरात यांनी प्रसंगावधान राखत कारचा नंबर त्यांच्या मित्र परिवाराला फोन करुन कळवला. फोनवरील माहितीच्या आधारे गाडीवर लक्ष ठेवण्यासाठी धनेगाव कँप परिसरात थांबलेले तरुण निघाले. त्यांना एक कार बंद पडलेली दिसली. चौकशी करण्यासाठी ते कारजवळ गेले, तेव्हा कारच्या डाव्या बाजूला धडक दिल्याचे निशाण त्यांना दिसलं. विकास थोरात यांना धडक देऊन आलेली हीच कार असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी ‘सोने कुठे आहे?’ असा थेट सवाल करत गाडीची झडती घेतली असता गाडीत दागिन्यांची पिशवी आढळून आली. गर्दी वाढत असल्याचं पाहून गाडीतील तिघांनी पोबारा केला तर एक जण पळून जात असताना विहिरीत पडला. विहिरीत पडलेल्या चोरट्याकडे रिव्हॉल्वर असून त्याद्वारे तो धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं तरुणांनी सांगितले. तरुणांनी ताबडतोब युसुफ वडगाव पोलिसांना घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत विहिरीत दोर सोडून आरोपी चोराला ताब्यात घेतलं. काही वेळातच परिसरातील माळावरुन आणखी एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला.

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget