(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SSC Result 2020 | औरंगाबाद विभागात सतत चार वर्ष अव्वल राहणारा बीड जिल्हा यावर्षी चौथ्या स्थानावर
आज लागलेल्या निकालांमध्ये बीड जिल्ह्याचा एकुण निकाल 91.24 टक्के इतका लागला आहे. यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी (94.36) अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 88.94 टक्के इतके आहे.
बीड : मागच्या चार वर्षापासून दहावीच्या निकालामध्ये औरंगाबाद विभागात बीड जिल्हा अव्वल राहिला होता मात्र यावर्षी दहावीचा निकाल बीड जिल्हा थेट चौथ्या क्रमांकावर गेला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा यावर्षी बीड जिल्ह्या साठी धक्कादायक निकाल लागला आहे.
औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा सर्वाधिक 94.4 टक्के इतका निकाल लागला असून औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल (92.10 टक्के) इतका लागला आहे. हिंगोली जिल्हा 91.94 टक्के निकाल घेत तिसर्या स्थानी, बीड जिल्हा 91.24 टक्के घेऊन चौथ्या स्थानी तर परभणी जिल्हा 90.66 टक्के निकाल घेवून पाचव्या स्थानावर राहिला आहे.औरंगाबाद विभागाचा एकूण निकाल 92 टक्के लागला आहे.
आज लागलेल्या निकालांमध्ये बीड जिल्ह्याचा एकुण निकाल 91.24 टक्के इतका लागला आहे. यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी (94.36) अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 88.94 टक्के इतके आहे.
कोरोनामुळे यावर्षी बहुतेक परीक्षा या रद्द कराव्या लागल्या लहान वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करावे लागले. दहावीचा निकाल सुद्धा दरवर्षी हा जून महिन्यामध्ये लागत असतो मात्र यावर्षी करूनच या संकटामुळे निकाल जुलै महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात लागला आहे. यात बीड जिल्ह्याचा 91.24 टक्के इतका लागला आहे.
मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 645 शाळांमधील 24 हजार 798 मुले व 18 हजार 307 मुली अशा एकुण 43 हजार 105 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. पैकी 24 हजार 612 मुले व 18 हजार 176 मुली अशा एकुण 42 हजार 788 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.दहावीच्या आज लागलेल्या निकालावरुन यापैकी 21 हजार 890 मुले 17 हजार 150 मुली असे एकुण 39 हजार 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णचे प्रमाण अधिक आहे. हे निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक 93.85 टक्के निकाल परळी तालुक्याचा लागला असून त्या खालोखाल आष्टी तालुक्याने 93. 38 टक्के निकाल घेत जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आहेत तर अंबाजोगाई तालुका 93.3 टक्के निकाल घेत जिल्ह्यात तृतीयस्थानी राहिला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून अभिनंदन केले जात आहे.
तालुकानिहाय निकालपरळी-93.85 आष्टी-93.38 अंबाजोगाई-93.03 बीड-90.67 पाटोदा-87.38 गेवराई-92.23 माजलगाव-86.88 केज-92.99 धारुर-86.80 शिरुर-88.17 वडवणी-90.73
संबंधित बातम्या :