घरासमोर शतपावली करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना स्कार्पिओने चिरडले; अपघातात दोघींचाही दुर्दैवी मृत्यू
हा अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पियो गाडीने दोघींनाही दोनशे ते तीनशे फूट फरफटत नेल. तरीदेखील चालकाने गाडी थांबवली नाही.

बीड : पाटोदा तालुक्यात असलेल्या धनगरजवळका या गावांमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या घरासमोर शतपावली करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणीला एका भरधाव स्कॉर्पिओने धडक दिली. या अपघातात दोघी बहिणींचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहिनी गाडेकर आणि रोहिणी गाडेकर असं या दोन्ही मृत बहिणींची नावं आहेत.
मोहिनी आणि रोहिणी या दोघी बहिणी रविवारी रात्री धनगर जवळका येथे असलेल्या आपल्या घरासमोर शतपावली करत होत्या. याच वेळी समोरून त्यांच्या दिशेने येणाऱ्या स्कार्पिओ गाडीने (एम एच 12 ए आर 9113) त्यांना जोराची धडक दिली आणि यामध्ये दोघींचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मोहिनी गाडेकर हि 27 वर्षाची आहे तर रोहिणी गाडेकरच वय 23 वर्षे आहे. हा अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पियो गाडीने दोघींनाही दोनशे ते तीनशे फूट फरफटत नेल. तरीदेखील या चालकाने गाडी थांबवली नाही आणि याच गाडीची एका दुचाकीला धडक लागून दोन तरुणदेखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर स्कार्पिओ गाडीचा चालक फरार झाला असून त्याच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेनंतर मात्र धनगरजवळका गावावर शोककळा पसरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
























