एक्स्प्लोर
बीड: नगपरापालिकेसाठी काका-पुतण्या आमने-सामने
बीड: बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा काका-पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. बीडमध्ये संदीप क्षीरसागर विरूद्ध भारतभूषण क्षीरसागर असा सामना रंगणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचं गेल्या 15 वर्षांपासून बीड नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व आहे. तर आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे बंधू रवी क्षीरसागर यांचा मुलगा संदीप हा बीड जिल्हा परिषदेचा सभापती आहे.
मात्र, कुटुंबातील कलहामुळे काका-पुतणे एकमेकांसमोर उभे ठाकलेत आहेत. संदीप क्षीरसागर यांनी विकास आघाडी स्थापन करुन आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे.
संदीप क्षीरसागर यांनी चुलत्या विरोधात दंड थोपटल्याने काका-पुतण्याचा वाद बीडच्या नगरपालिका निवडणुकीत रंगणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement