Baramati Robbery : बारामतीत चोरांचा सुळसुळाट! एकाच रात्रीत 8 ते 9 घरांवर दरोडा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत रात्रीत घरफोड्या झाल्या आहेत. बारामती शहरातील देसाई इस्टेट जवळ आणि बारामती शहरात एका रात्रीत चोरट्यांकडून तब्बल 15 ते 16 घरफोड्या झाल्याची घटना घडली.
बारामती, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (baramati) बारामतीत रात्रीत घरफोड्या (Robbery) झाल्या आहेत. बारामती शहरातील देसाई इस्टेट जवळ आणि बारामती शहरात एका रात्रीत चोरट्यांकडून तब्बल 15 ते 16 घरफोड्या झाल्याची घटना घडली. यामध्ये सोने चांदी रोख रक्कम चोरीस गेल्याची माहिती मिळत आहे. चोरट्यांनी (crime news) बंद घरे फोडली आहेत. या चोरीत जवळपास 25 तोळे सोने चांदी आणि 1 लाख रुपये कॅश लंपास केली आहे. बारामती शहर पोलिसांनी आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. मात्र एकाच रात्रीत एवढ्या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या बारामतीत चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीत चोरीचं प्रमाण वाढलं असल्याचं बोललं जात आहे. चोरांचं प्रमाणही वाढल्याचं चोरीच्या घटनांवरुन स्पष्ट होतं आहे. एकाच रात्रीत एक दोन नाही तर तब्बल 15 ते 16 घरं फोडल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
बारामतीत चोरांचा सुळसुळाट
काही दिवसांपूर्वी बारामतीतील शहरातील देवकाते नगर परिसरात देवकाते पार्क येथील एका घरात घुसून चोरट्यांनी 63 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. महत्वाचं म्हणजे चोरांनी थेट घरातील महिलेचे हात पाय बांधून ठेवले होते आणि त्यानंतर घरावर दरोडा टाकला होता. जमीन खरेदीसाठी आणून ठेवलेली 55 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याची चैन, मिनी गंठण, अंगठी, कर्णफुले, मोबाईल असा जवळपास 63 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली होती. महिलेचे हातपाय बांधून चोरी करणं गंभीर बाब आहे. या घटनेनंतर एकट्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला होता. त्यासोबत पोलिसांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
पुण्यातही चोरांची कमी नाहीच!
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत असतानाच दरोडा, मोबाईल फोन, दागिन्यांच्या चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता चोर चोरीसाठी नव्या वस्तूंचा आधार घेताना दिसत आहेत. उदरनिर्वाहासाठी तसंच इतर कारणांसाठी आता चप्पलची चोरी करण्याचा प्रकार समोर आला होता
इतर महत्वाची बातमी-
Pune Crime News : जुन्या वादाचा काटा काढला; मंगला टॉकिजसमोर घडला खुनाचा थरार, चार आरोपींना अटक