Balgandharva Music Festival : आज जळगावमध्ये बालगंधर्व महोत्सवाची सुरुवात झाली आहे. संतूर वादनासह कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्याच्या जुगलबंदीने महोत्सवाची सुरुवात झाली आहे. स्थानिक कलावंतांसह देश-विदेशात आपल्या कलेच्या माध्यमातून आपला ठसा उंटविणाऱ्या कलाकारानी महोत्सवाची मंगल, पवित्र सुरातील शिवतांडव स्त्रोत, संतुर वादन आणि कथ्थक, भरतनाट्यम यांच्या जुगलबंदीने बालगंधर्व महोत्सवाची सुरुवात झाली आहे.


द्विदशकपूर्ती अर्थात 20 व्या महोत्सवाची सुरुवात जळगावच्या कलाकारांच्या शिवतांडवाने झाली. 40 कलावंताच्या शिवतांडव उदयोस्तू जयजयकाराने बालगंधर्व महोत्सवाच्या सोहळ्याचा थाटामाटात आरंभ झाला. कोलकाताचे पंडित संदीप चॅटर्जी यांच्या सुंदरवादनाने रसिक मंत्रमृग्ध झाले. सुंदर बंदिश सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली आणि जळगावकर रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली. त्यांना तबल्यावर कोलकाताचे प्रसिद्ध तबलावादक संदिप घोष यांनी साथ केली. 


महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात अहमदाबादच्या मानसी मोदी आणि मानसी करानी यांची कथ्थक आणि भरतनाट्यमची जुगलबंदीने कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भरतनाट्यम आणि कथ्थक हे भारतीय शास्त्रीय नृत्याचे दोन प्रवाह आहेत. या जुगलबंदीला म्हणूनच मानसी द्वियींनी 'संगम' असे सार्थ शीर्षक दिले. 


जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे प्रायोजीत स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, तसेच दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने 20 व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे दीपप्रज्वनाने औपचारिक उद्घाटन झाले. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha