Coronavirus in Childrens : देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभावत आहे. तिसऱ्या लाटेची आणखी एक भितीदायक बाब म्हणजे मुलांमध्ये होणारा संसर्ग. जगात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यावेळी मुलांना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे अधिक आहेत. त्यामुळा आता प्रश्न उद्भवतो की, या लाटेत मुलांना जास्त संसर्ग होण्याचे कारण काय आणि त्यांना बचाव कसा करायचा.


गेल्या 15 दिवसांत देशाच्या विविध भागातून असे काही अहवाल आले आहेत, ज्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. 22 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात याच शाळेतील 29 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. सहा दिवसांनंतर बिहारच्या शेखुपुरा येथे 18 मुले पॉझिटिव्ह आल्याची बातमी आली. त्याच दिवशी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील दोन शाळांमधील 36 मुले पॉझिटिव्ह आढळली. नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी उत्तराखंडमधील एका शाळेत 82 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट धडकल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.


लहान मुलेही कोरोनाने संक्रमित होत आहेत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये 241 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात वाचली. लहान मुलांची प्रतिकारशक्ती मोठ्यांपेक्षा चांगली असते, असे म्हटले जात होते, पण यावेळी हे संरक्षण कवचही कोसळताना दिसत आहे. ज्या शहरांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे, तेथे कोरोनाने पीडित मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे.


मुंबईत गेल्या एका महिन्यात तीन हजार 516 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. महाराष्ट्रातील मुलांसाठी कोरोनाची विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आली असून, ते लहान मुलांमधील कोरोनाच्या संसर्गावर लक्ष ठेवून आहे. या टास्क फोर्सचा असाही विश्वास आहे की तिसरी लाट मुलांसाठी धोक्याचे संकेत देत आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता डॉक्टर आता याचे कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे एक नाही तर अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha