एक्स्प्लोर

बालभारतीकडून पूरग्रस्त भागात तातडीने दीड लाखांहून अधिक पुस्तकं वाटप

या भागातील विद्यार्थ्यांना हव्या त्या पोशाखात शाळेत प्रवेश द्यावा असं सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ मदत करण्यात येत आहे.

मुंबई : राज्यात सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांची पुस्तकं, गणवेश त्यासोबतच शालेय साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बालभारतीने तातडीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप केली आहे. ही पुस्तकं 2 महापालिका आणि 5 जिल्हापरिषदांमध्ये वाटप करण्यात आली आहे. आतापर्यंत कोल्हापूर, सांगली , सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ठिकाणी पुरस्थितीमुळे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी 1,54,917 पुस्तके वाटप करण्यात आली असून यामध्ये सांगली महानगरपालिकेला 34,628 पुस्तकं, कोल्हापूर महानगरपालिकेला 10,293 पुस्तकं, पळूस तालुक्यासाठी 19208 पुस्तकं, वाळवा तालुक्यात 35,574 पुस्तकं, मिरज तालुक्यात  33995 पुस्तकं तर शिरोळ तालुक्यात 16,695 पुस्तकं वाटप करण्यात आली आहे. याशिवाय, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेला सुद्धा 4,5171 पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना या भागात गणवेश सक्ती करण्यात येऊ नये, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 14 ऑगस्टला राज्याच्या शिक्षण विभागाकडून पूरस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त भागात झालेल्या शालेय साहित्यच्या नुकसानीनंतर परिपत्रक काढून बालभारतीला मोफत पुस्तके या शालेय विद्यार्थ्यांना  देण्यात यावे, असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. शिवाय, या भागातील विद्यार्थ्यांना हव्या त्या पोशाखात शाळेत प्रवेश द्यावा असं सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ मदत करण्यात येत आहे. त्यामुळे 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान ही पुस्तके या पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली असून गरज पडल्यास आणखी पुस्तकाचा पुरवठा बालभारतीकडून करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Goa Travel Restrictions : पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Embed widget