एक्स्प्लोर
चालत्या सायकलवर मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं
अमरावती जिल्ह्यामधील दर्यापुर तालुक्यातील तोंगलाबाद येथील जय बजरंग व्यायाम शाळेचे विद्यार्थी चक्क चालत्या सायकलवर मल्लखांब खेळतात.
अमरावती : अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील जय बजरंग व्यायाम शाळेचे विद्यार्थी चक्क चालत्या सायकलवर मल्लखांब खेळतात. विशेष म्हणजे एकाचवेळी चार-पाच नव्हे तर तब्बल 12 ते 15 विद्यार्थी या मल्लखांबाचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसतात. त्यामुळे परिसरात या व्यायाम शाळेचं कौतूक होतं आहे.
लहान मुलांना आपली कला दाखवता यावी या उद्देशाने 1977 साली बंजरंग व्यायाम शाळेची स्थापना करण्यात आली होती. शिवाय आतापर्यंत या व्यायाम शाळेतील अनेक विद्यार्थांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
या व्यायाम शाळेचं श्रीराम जऊळकर हे काम पाहतात. मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना तसं प्रशिक्षण देण्याचं काम ही शाळा करते. मल्लखांब या खेळाला चालना मिळावी, या खेळाची प्रचिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी श्रीराम जऊळकर प्रयत्नशील आहेत.
जऊळकर हे महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्राबाहेर जाऊन मल्लखांबचे आणि विविध प्रकारच्या व्यायामाचे धडे देतात. आत्तापर्यंत बंजरंग व्यायाम शाळेचे एकूण 50 पेक्षा जास्त विद्यार्थी सैन्यामध्ये भरती झाले आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे.
विदेशी खेळांना आपल्या देशात प्राधान्य मिळते पण ग्रामीण भागातील अस्सल खेळाला प्राधान्य मिळत नसल्याची खंत यावेळी व्यायाम शाळेच्यावतीने व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement