एक्स्प्लोर

Bail Pola : बैल पोळा नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पोळ्याचं महत्व

दरवर्षी मोठ्या उत्साहात बैल पोळ्याचा सणा साजरा केला जातो. यावर्षी 14 सप्टेंबरला गुरुवारी बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे. पाहुयात बैल पोळ्याचे महत्व.

Bail Pola : दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा (Bail Pola) साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह , विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. यावर्षी 14 सप्टेंबरला गुरुवारी बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान, बैलपोळ्याचा सण नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैलपोळ्याचं महत्व काय? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. 

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. 

बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं

शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला विशेष महत्व आहे. बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्‍या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो.

बैल पोळ्याच्या दिवशी काय केलं जातं?

या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणुकीत काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.

बैल पोळा पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रुपात धर्तीवर अवतरले होते, तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.

महत्त्वाच्या बातम्या:

Bail Pola 2022 : औरंगाबादमध्ये लकी ड्रॉ पद्धतीने पोळा सण साजरा, मानापानावरुन होणारा वाद टाळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
थरकाप! शाळकरी तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
थरकाप! शाळकरी तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
Suchir Balaji : ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
Sanjay Raut : भाजप हिंदुत्त्वाचे बाप बनलेत का? त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं; संजय राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, हिंमत असेल तर...
भाजप हिंदुत्त्वाचे बाप बनलेत का? त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं; संजय राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, हिंमत असेल तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narsobachi Wadi Datta Jayanti : दत्तजयंतीनिमित्त नरसोबाच्या वाडीत गर्दी, दर्शनासाठी रांगDevendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात, भाजपकडून जय्यत तयारीKishore Tiwari On Sanjay Rathod :भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट आमदाराला मंत्रिपद देऊ नका : किशोर तिवारीMaharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी तीननंतर नागपुरात होणार शपथविधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
थरकाप! शाळकरी तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
थरकाप! शाळकरी तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
Suchir Balaji : ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!
Sanjay Raut : भाजप हिंदुत्त्वाचे बाप बनलेत का? त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं; संजय राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, हिंमत असेल तर...
भाजप हिंदुत्त्वाचे बाप बनलेत का? त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं; संजय राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, हिंमत असेल तर...
Devenra Fadnavis In Nagpur: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'  
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'  
Maharashtra Temperature Update: गोंदियात आज 6.9अंश! उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान? वाचा सविस्तर
गोंदियात आज 6.9अंश! उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान? वाचा सविस्तर
अहिल्यानगरचा 'किम जोंग उन' झळकला हिंदी टेलिव्हिजनवर, गीता माँसोबत मराठी संवाद, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता आहे तरी कोण?
अहिल्यानगरचा 'किम जोंग उन' झळकला हिंदी टेलिव्हिजनवर, गीता माँसोबत मराठी संवाद, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता आहे तरी कोण?
Buldhana Accident: भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
Embed widget