एक्स्प्लोर
अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल : पुण्यात कमळ फुलण्याची चिन्हं

मुंबई : राज्यातील दहा महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 23 फेब्रुवारीच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. परंतु त्याआधी अॅक्सिस-इंडिया टुडेने केलेल्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपचं कमळ फुलण्याची चिन्हं आहेत. एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. 162 जागांच्या पुणे महापालिकेत 77 ते 85 जागांसह भाजप मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. अॅक्सिस-इंडिया टुडेचा अंदाज, मुंबई,ठाणे, पुण्यात कोणाची सत्ता? तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 60 ते 66 जागा मिळतील. याशिवाय शिवसेनेला 10 ते 13 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता अॅक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे. तसंच मनसेला 3 ते 6 आणि इतरांना 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ठाण्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज
पुणे भाजप : 77 ते 85 काँग्रेस-राष्ट्रवादी : 60 ते 66 शिवसेना : 10 ते 13 मनसे : 3 ते 6 इतर : 1 ते 3
पुणे भाजप : 77 ते 85 काँग्रेस-राष्ट्रवादी : 60 ते 66 शिवसेना : 10 ते 13 मनसे : 3 ते 6 इतर : 1 ते 3 आणखी वाचा























