एक्स्प्लोर

अॅक्सिस बँक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना नोटिस, चार आठवड्यात उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या पगाराच्या खात्याबाबतच्या केसमध्ये नोटीस बजावली आहे.

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या पगाराच्या खात्याबाबतच्या केसमध्ये नोटीस बजावली आहे. या प्रकरणात फडणवीस यांना चार आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे. 

2019 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा तमोहनीश जबलापुरे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका केली होती.  मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस ज्या ॲक्सिस बँकेत उच्च पदावर नोकरीला आहेत, त्या बँकेला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला, असे त्यांचे म्हणणे आहे.   याचिका दाखल होण्यापूर्वी हायकोर्टाने फडणवीसांना नोटीस बजावली  होती.  जी पत्ता बदलल्यामुळे त्यांच्यापर्यंत तेव्हा पोहोचू शकली नाही. दरम्यानच्या काळात यामध्ये पुढे काही झाले नाही. आता परत एकदा याचिका दाखल करण्याअगोदर पत्ता सुधारित करून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 

काय आहेत आरोप?

 फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांचे पगाराचे खाते ॲक्सिस बँककडे वळवले

 तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे खाते सुद्धा ॲक्सिस बँकेला दिले

ॲक्सिस बँकेत त्यांची पत्नी अमृता फडणवीस या उच्च पदावर कार्यरत आहे

 यासाठी 2017 चे सरकारचे एक सर्क्युलर याचिकाकर्त्यांना पुरावा म्हणून सादर केले आहे

असे केल्यामुळे ही खाती आधी ज्या राष्ट्रीयीकृत बँकांकडे होती त्यांना नुकसान झाले असून हा निर्णय परत  घेत चौकशी करावी अशी या याचिकेत मागणी आहे 

 महत्वाचं आहे की, अजून कोर्टाने याचिका दाखल करून घेतलेली नसून, ही नोटीस बिफोर अॅडमिशन आहे. याआधी या प्रकरणावर फडणवीसांच्या बाजूना आलेल्या स्पष्टीकरण असं सांगण्यात आलं होतं की, ही खाती साल 2005 पासून यूटीआय बँकेकडे होती. जिचे नाव नंतर ॲक्सिस बँक झाले. त्यामुळे हा निर्णय झाला तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री नव्हते. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
Parinay Fuke On Rohit Pawar : राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Embed widget