Kalyan: तब्बल साडे तीन हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याण मधील अवलिया
Wartime Helmets Collection: 'सर सलामत तो पगडी पचास' ही म्हण आपल्याकडे फार पूर्वीपासूनच प्रचलित आहे. मात्र कल्याणातील एका अवलियाच्या अनोख्या छंदामुळे ती बदलून 'सर सलामत तो पगडी तीन हजार' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
Wartime Helmets Collection: 'सर सलामत तो पगडी पचास' ही म्हण आपल्याकडे फार पूर्वीपासूनच प्रचलित आहे. मात्र कल्याणातील एका अवलियाच्या अनोख्या छंदामुळे ती बदलून 'सर सलामत तो पगडी तीन हजार' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अनंत जोशी असं या अवलियाचे नाव असून ते कल्याण मधील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे जगभरातील थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 3 हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह आहे.
कल्याण मध्ये राहणारे अनंत जोशी हे मूळचे व्यावसायिक मात्र आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत त्यांनी गेल्या 35 वर्षांपासून हा आपला अनोखा छंद जोपासला आहे. कल्याण स्टेशन परिसरातील त्यांच्या जुन्या घरात हा ठेवा जोपासला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी ते खूप आजारी होते. आजारपणात त्यांनी महाभारत रामायण सिरियल बघितल्या या सिरीयल मध्ये घातलेले टोप त्यांना आकर्षित करत होते. या टोपबद्दल माहिती मिळवताना त्यांची जिज्ञासा वाढत गेली .त्यातून त्याना इतिहासकालीन विविविध देशातील टोप्या जमा करण्याचा छंद लागला .या संग्रहालयाच त्यांनी शिरोभूषण अस नामकरण देखील केलं आहे. भारतात सत्ता गाजवलेल्या मराठा, राजपूत, मुघल काळातील युद्धकालीन शिरस्त्राण, जिरेटोप आदींचां खजिना आहे. जगभरातील ब्रिटन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया आदी देशांतील विविध टोप्या, पगड्या, युद्धकालीन जिरेटोप, शिरस्त्राण जोशी यांच्या इसंग्रही आहेत. यातील सर्वात जुने म्हणजे 18 व्या शतकात अफाणिस्तानमध्ये धातूंपासून बनवलेले शिरस्त्राणही आपल्या संग्रही असल्याचे जोशी यांनी सांगितले.
वयाच्या 17 व्या वर्षापासून भारतासह 5 ते 7 देश भटकंती करत, इतर देशातून माहिती मिळवुन त्या ठिकाणाहून टोपी आणत, हजारो लोकांशी भेटून 35 वर्ष मेहनत घेत त्यांनी हा संग्रह जतन केला आहे. तर 2005 च्या महापुरात यातील सुमारे 200 टोप्या, पगडी, शिरस्त्राण पाण्यात भिजून खराब झाल्याने फेकून द्यावे लागल्याची दुःखद आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. जोशी यांच्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुकने घेतली असून लिम्का बुकमध्ये गेल्या 20 वर्षांपासून तर इंडिया बुकमध्ये गेल्या 10 वर्षांपासून या आपल्या छंदाचा समावेश केला आहे. तर संपूर्ण जगभरात मानाचे स्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या गिनीज बुकनेही आपल्या कामाची दखल घेतली असल्याचे अनंत जोशी यांनी सांगितले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha