एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये पाण्यासाठी भाजपचा जल आक्रोश मोर्चा; अब्दुल सत्तार म्हणाले, 'हा तर सत्ता आक्रोश...'

Aurangabad Water Crisis : औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून सतत आक्रमक भूमिका घेतली जात आहे. याच मुद्यावरून आज 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे.

Aurangabad Water Crisis : औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून सतत आक्रमक भूमिका घेतली जात आहे. तर याच मुद्यावरून आज शहरातील पैठणगेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. भाजपच्या या मोर्चाला 14 अटींसह पोलिसांनी परवानगी दिली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी भाजपचे अनेक महत्वाचे नेते या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. 

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून आज दुपारी 4 वाजता हा 'जल आक्रोश' मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री दानवे, भागवत कराडांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत तर मोर्चामध्ये महिला दूषित पाणी आणि डोक्यावर हंडे, घागरी घेऊन सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळवण्यात आली आहे. 

जल आक्रोश मोर्चा नाही तर सत्ता आक्रोश मोर्चा - अब्दुल सत्तार
दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा भाजपचा जल आक्रोश मोर्चा नाही तर सत्ता आक्रोश मोर्चा आहे, असं म्हटलं आहे.  भाजप सत्तेत असताना औरंगाबादकरांना योजना दिली. जर शहराला पाणी द्यायचं होतं तर सुरुवातीला योजना देऊन ती पूर्ण करायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी योजना दिली आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल काही अडथळे येतात पण लवकरच योजना पूर्ण होईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं  नाटक आहे. हा राजकीय मोर्चा आहे, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. 

सत्तार म्हणाले की, रावसाहेब दानवे यांना आपल्या स्वतःच्या गावाला पाणी देता आलं नाही. किती दिवस झालं ते राजकारणात आहेत, त्यानंतर मी योजना पूर्ण करून पाणी आणलं. पण त्यांना त्यांच्या गावाला पाणी देता आलं नाही. जाफराबादला पाणी नाही, औरंगाबादची इतकी काळजी असती तर पाच वर्षे दिल्लीत सत्ता होती. महाराष्ट्रात सत्ता होती, तेव्हा त्यांनी ही योजना औरंगाबादला का दिली नाही. सत्तेपासून दूर ठेवलं म्हणून हा आक्रोश आहे. जल तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे हेच देतील. मोर्चाच्या माध्यमातून चर्चा व्हावी यासाठी जल मोर्चा हे नाव दिलं आहे, असं सत्तार म्हणाले. 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget