एक्स्प्लोर

वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नाही: पोलीस

औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्वत:च वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं सांगितलं आहे.

औरंगाबाद: महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराला मराठा मोर्चा जबाबदार नाही, या दाव्याला आता पुष्टी मिळत आहे. कारण औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्वत:च वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं सांगितलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. मराठा आंदोलनात काही बाहेरचे लोक घुसले असल्याची तक्रार क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मात्र हे लोक नेमक्या कुठल्या चळवळीशी संबंधित होते याबाबत तपासानंतरच सांगता येईल असंही चिरंजीव प्रसाद म्हणाले. 9 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीत बंद कंपन्यांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. मात्र ही तोडफोड मराठा मोर्चेकऱ्यांनी नाही तर बाहेरच्या व्यक्तींनी केल्याचा दावा मराठा मोर्चाच्या आयोजकांनी केला होता. तसंच त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. सध्या पोलिसांचं अटकसत्र सुरु असून, या तोडफोडप्रकरणी 53 जणांना अटक केली आहे. आधी अटक केलेल्या 37 जणांमध्ये 18 जण हे मराठा समाजाचे नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी या तोडफोडीचा आणि मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. पोलिस आयुक्त काय म्हणाले? वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणी आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये गंभीर कलमे लागली आहेत. आम्हाला जे व्हिडीओ मिळाले, कंपन्यांमधून मिळाले, काही व्हिडीओ आम्ही शूट केले, काही लोकांनी दिले, त्यानुसार आम्ही  53 लोकांना अटक केली आहे.  अजून अटकसत्र सुरुच आहे. तोडफोड करणारे मराठेतर होते का? आम्ही आरोपीकडे बघताना जात बघत नाही. परंतु आम्ही हे ठामपणे सांगतो की ते गुन्हेगार आहेत आणि त्यांचा मराठा चळवळीशी संबंध नाही. आतापर्यंतच्या तपासात एकदम क्लिअर झालं आहे की तोडफोड करणाऱ्यांचा आणि मराठा मोर्चाचा किंवा त्यांच्या समन्वयकांचा काहीही संबंध नाही. गुन्ह्याच्या उद्देशानेच त्यांनी ही तोडफोड केली आहे, असं पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं. मोर्चाआडून तोडफोड करण्याची काय कारणं आहेत? आम्ही कारणं शोधतोय. बहुतेक मुलं आहेत ते या किंवा अन्य कंपनीत तात्पुरते/हंगामी कर्मचारी म्हणून कामं केलं आहे, असं प्रसाद यांनी सांगितलं. मोर्चाआडून काही चळवळीचे लोक घुसले? क्रांती चौक परिसरात अशी एक तक्रार दाखल झाली. त्याअनुषंगाने गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही विविध फुटेज आणि लोकांचे जबाब नोंदवत आहोत. क्रांती चौक परिसरात बऱ्याच समाजाचे बरेच लोक होते. त्यामुळे आताच बोलणं योग्य नाही. तपासाअंती कमेंट करणं उचित ठरेल, असं चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं. नवा व्हिडीओ वाळूजमध्ये झालेल्या विध्वंसाचा नवा व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे. वाळूजमधल्या एमआयडीसीमध्ये घुसलेल्या आंदोलकांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कसा धुडगूस घातला याचा पुरावा देणारा हा व्हीडिओ पोलिसांकडेही देण्यात आलेला आहे.  त्यामुळे त्यातल्या चेहऱ्यांना हेरून त्यांची धरपकड सुरु झालेली आहे. आमदार हर्षवर्धन जाधवांचा आरोप औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक वसाहतीमधील तोडफोड लेबर कॉन्ट्रॅक्टर, सप्लाय चेनमधील लोक आणि परप्रांतियांनी केली असून, त्याचं बिल मराठा आंदोलकांवर फाडलं जातंय, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. तसेच, तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांनी स्वतःचे प्रायव्हेट इश्यूज सेटल करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव काल जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. वाळूज तोडफोड प्रकरण वाळूज एमआयडीसीतील 50 कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, 60 कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेतलं असून, 37 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी  वाळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली. संबंधित बातम्या  वाळूज एमआयडीसीत तोडफोड करणारे 18 जण मराठेतर वाळूज MIDC तोडफोडीत परप्रांतियांचा हात : हर्षवर्धन जाधव वाळूज एमआयडीसी तोडफोडीचे पंचनामे, 60 कोटीचं नुकसान, धरपकड सुरुच

महत्त्वाच्या बातम्या

कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget