Aurangabad News : औरंगाबादकर रचणार नवा विक्रम! 150 मर्सिडीजनंतर 250 इलेक्ट्रिकल वाहनं एकाच वेळी खरेदी करणार
Aurangabad News : औरंगाबादकर नवा विक्रम रचण्याच्या तयारीत असून 150 मर्सिडीजनंतर 250 इलेक्ट्रिकल वाहनं एकाच वेळी खरेदी करणार आहेत.
Aurangabad News : उद्योग नगरी आणि पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादनं एकाच वेळी दीडशे मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम केला आहे. औरंगाबादला वेगवेगळ्या कारणांसाठी जागतिक स्थरावर ओळखलं जातं. आता हे ऐतिहासिक औरंगाबाद शहरानं एकाच वेळी 250 इलेक्ट्रिक चारचाकी वाहनं घेण्याचा विक्रम करण्याची तयारी सुरु केली आहे. शहरातील वेगवेगळे नामांकित उद्योजक आणि इतर नागरिकांनी एकाच वेळी 250 इलेक्ट्रिकल चारचाकी कार घेण्याबाबतच्या डीलला अंतिम रूप देण्यात आलं आहे. या महिन्याच्या अखेरपासून मार्चपर्यंत सर्व वाहनं ग्राहकांना सुपुर्द करण्यात येणार आहेत.
शहरातील जालना रोडवर असलेल्या इलेक्ट्रिकल चारचाकी वाहनांचे शोरूम मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिकल वाहनांना देण्यात येणाऱ्या सबसिडीची योजना मार्चपर्यंत वाढविण्यात आली असून या सबसिडीचा फायदा घेत एकाच वेळी 250 वाहने खरेदी करण्याबाबत औरंगाबाद येथील काही नामांकित उद्योजकांचा एकमत झालं आहे. वाहानांची उपलब्धता ही समस्या होते. ही वाहनांची उपलब्धता दूर करण्याचं वचन एका वाहन डिलरनं दिलं आहे. एकाच वेळी एवढी वाहनं बुक होत असल्यानं वाहनं वेळेत देण्याबाबतही महाराष्ट्रातील एका नामांकित इलेक्ट्रिकल उत्पादन करणाऱ्या कंपनीनं वचन दिलं आहे. याशिवाय वाहन खरेदी करण्याबाबत बँकांकडून काही कर्ज उपलब्ध करून देता येत आहे का? याबाबतची चाचपणी सुरु असून काही बँका कर्ज देण्यासाठी देखील तयार आहेत. एकाच वेळी एवढी वाहनं खरेदी करण्याचा आणि संपूर्ण देशाला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणं, हा या मागचा मुख्य हेतू असल्याचं देखील काही उद्योजकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
केवळ महाराष्ट्रच नाहीतर देशात एकाच वेळी एका शहरांमध्ये एवढी इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करण्याचा हा पहिलाच उपक्रम असू शकतो. ही वाहनं ज्यावेळी शहरांमध्ये येतील, तेव्हा या वाहनांची रॅली काढली जाणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित लोकही या रॅलीमध्ये सहभागी असतील, असं देखील काही उद्योजकांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी इलेक्ट्रिकल वाहनांच्या संदर्भामध्ये जनजागृती करत आहेत. आपल्या बहुतांश भाषणांमध्ये ते इलेक्ट्रिकल कारबाबत लोकांना भरभरून सांगतात. इलेक्ट्रिकल वाहनं रस्त्यावर वाढली तर पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी मदत होईल, असं वारंवार सांगितलं आहे. शिवाय इलेक्ट्रिकल्स चार्जिंग स्टेशनही वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यातूनच प्रेरणा घेऊन हा अनोखा उपक्रम करण्याचा औरंगाबादेतील काही नामांकित व्यक्तींनी ठरवलं आहे.
एप्रिल महिन्यात ही वाहानं लोकांना मिळतील आणि ही अशा पद्धतीनं योजना करण्यात येत आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करण्यामागचा हेतू लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत जागृती व्हावी आणि लोकांनी ही वाहन खरेदी करण्यासाठी पसंती द्यावी, हा हेतू असल्याचं देखील काही मंडळींनी सांगितलं आहे. औरंगाबादेत मर्सिडीजनंतर आता एकाच वेळी 250 इलेक्ट्रिकल वाहनांच्या डिलबाबत उत्सुकता आहे. अशा पद्धतीची डील झाली तर पुन्हा एकदा औरंगाबाद एक विश्वविक्रम करेल त्याचबरोबर पर्यावरणासाठी सामूहिक प्रयत्न करताना दिसेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pune Accident News : पुणे नगर महामार्गावर विचित्र अपघात; चार जण जागीच ठार
- Pune School Reopen : पुण्यातील शाळांबाबत पुढील 7 दिवसांमध्ये निर्णय घेणार : अजित पवार
- ...तर राज्य केंद्र सरकारला चालवायला द्या; चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा