एक्स्प्लोर
आधी विषप्राशन, मग गळफास, गावगुंडांमुळे तरुणीची आत्महत्या
औरंगाबादेतील तरुणीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून चार दिवसांपूर्वी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर आता गळफास घेतला.

औरंगाबाद : गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादेत 17 वर्षीय तरुणीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप केला जात आहे. चार दिवसांपूर्वी विष पिऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर आता गळफास घेतला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील तांदूळवाडीमध्ये 17 वर्षीय प्रियंका मोरे राहत होती. गावातील तरुण तिला फोन करुन नेहमी त्रास देते असत. त्याचप्रमाणे घरी कुणी नसल्यावर घरी येऊनही त्रास देत असत, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. गावगुंडाच्या त्रासाला कंटाळूनच प्रियंकाने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. प्रियंकाने चार दिवसापूर्वी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला होता. परंतु त्यानंतर प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Before You Go
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















