एक्स्प्लोर
कुत्रा चावलेल्या दोन गायींचं दूध प्यायल्याने 81 जणांना विषबाधा

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दोन गायींचं दूध प्यायल्यानं गावातल्या तब्बल 81 जणांना विषबाधा झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील धानोरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी याच 2 गायींना पिसाळलेला कुत्रा चावला होता. मात्र त्यानंतर या गायींवर कोणतेही उपचार न झाल्याचा संशय आहे. त्यामुळे दोन दिवसात हे विष गायींच्या दुधात पोहोचलं. हेच विषारी दूध प्यायल्यानं धानोऱ्यातील तब्बल 81 जणांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या आरोग्यपथक धानोरा गावात दाखल झालं आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















