Aurangabad : 'पीएचडी करायचीय तर गाईडला 25 हजार द्या!' संभाषणाची क्लिप व्हायरल; कुलगुरू, पोलिसांकडे तक्रार
BR Ambedkar Marathwada Vidyapeeth एका ऑडिओ क्लिपनं औरंगाबादमधील शिक्षणक्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. 'संशोधन करायचे गाईडला 25 हजार द्या' अशा आशयाच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे.
Aurangabad BR Ambedkar Marathwada Vidyapeeth Phd Issue: औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या एका प्रकरणाची चर्चा सुरु आहे. एका ऑडिओ क्लिपनं औरंगाबादमधील शिक्षणक्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. 'संशोधन करायचे गाईडला 25 हजार द्या' अशा आशयाच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. यासंदर्भात कुलगुरू, पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
एक प्राध्यापिका संशोधक विद्यार्थिनीला प्रति विद्यार्थी 25 हजार आता आणि तेवढेच पैसे वायवाच्या वेळी गाईडला द्यावे लागतील, असे म्हणून पैसे आणून देण्याची मागणी करत असल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे 50 हजारांची लाच मागण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये विद्यार्थी संघटनेने कुलगुरूकडे आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे.
प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी यांच्यातील संभाषण...
प्राध्यापिका: अंजली, सरांचा (गाईड) मला कॉल . आला होता. तुम्ही त्यांच्याशी बोललात म्हणे.
विद्यार्थिनी: हो मॅम,
प्राध्यापिका: तुम्ही तिकडे गेलात, मला सांगितले नाही तुम्ही?
विद्यार्थिनी: नाही, मॅम. तुम्ही म्हटले तुम्हाला खूप प्रेशर आले. म्हणून मी त्यांना बोलले.
प्राध्यापिका: सर मला म्हणाले, तुम्ही विद्यार्थिनींना थेट का म्हटले?
विद्यार्थिनी: मॅम, हे चुकीचे आहे. त्यांनी तुम्हाला यात ओढायला नको होते.
प्राध्यापिका: बेटा, या लाईनमध्ये असे होते. सर मला म्हणाले, आता बघा, मी काय करतो. मी त्यांना म्हटले, असं करू नका. तुम्ही माझ्या
बद्दलही सरांजवळ चुकीचे बोलल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थिनी: नाही मॅम, काहीच नाही. उगाच ते . तुम्हाला म्हणत आहेत. मी फक्त सरांना म्हटले, तुम्हाला बोलायचे आहे. तुम्हाला कॉलेजला भेटायला येते उद्या. एवढेच बोलले.
प्राध्यापिका: सर, मला म्हटले रात्री घरी येतो. तुम्ही त्यांना सांगा, आणून द्या.
विद्यार्थिनी: किती वाजता येतील मॅम सर?
प्राध्यापिका: ते त्यांच्या सोयीने येतात. आठ साडेआठ वाजता येतील. सर विचारत होते. मॅडम हा माझ्या तुमच्यातील विषय आहे. तो विद्यार्थ्यापर्यंत जात तर नाही ना?
विद्यार्थिनी: सर सर्वच विद्यार्थ्यांसोबत असे करतात का ?
प्राध्यापिका: हो, मला माहिती आहे ना, ते काय करतात. म्हणून मी तुम्हाला पूर्ण सांगितले नाही. कारण ते तुमचे गाईड आहेत. एवढेच म्हटलं, बाई देऊन टाका त्यांना व्हायवाच्या वेळी वाटल्यास मी त्यांना विनंती करेल. तर तू ऐकायला तयार नाही. कालपासून मला झुलवत ठेवलं म्हटलं तरी चालेल,
विद्यार्थिनी: मॅडम आम्हाला तेच चांगले वाटले नाही. तुम्हाला का त्रास आमच्यामुळे? म्हटलं थेट डील करावी.
प्राध्यापिका: पण, सर मला यात समाविष्ट करत आहेत. कारण ते दुसऱ्यांवर भरवसा ठेवत नाहीत. त्यांना तुम्ही पैसे द्या. माझ्यावर तरी विश्वास ठेवा.
विद्यार्थिनी: ते सारखेच पैसे मागत राहिले तर...? .
प्राध्यापिका: असा कसा मागेल सारखा पैसे? मी त्यांचे नरडे नाही पकडणार का? शेवटी व्हायवाच्या वेळीही तो तुम्हाला म्हणेल,
विद्यार्थिनी: त्यावेळी किती पैसे द्यावे लागतील?
प्राध्यापिका: हीच रक्कम असेल.
विद्यार्थिनी: २५ हजार रुपये?
प्राध्यापिका: हो, मी त्यांना विनंतीही करेल, की घेऊ नका म्हणून पैसे.
विद्यार्थिनी: साडेचार वाजता येऊ का?
प्राध्यापिका: तू मला पाच वाजता इथे पैशांसोबत पाहिजे. माझ्या पतीचे त्याच्याशी चांगले संबंध आहे. त्याचा मी कान पकडून त्याला झापू शकते.
विद्यार्थिनी: मॅडम, वहिनी सांगत होत्या तुमचा फोन आला होता.
प्राध्यापिका: हो, तुम्ही या लवकर,
विद्यार्थिनी: 25 हजार एकदम नाही जमणार, 25 हजार दोघींचे आहेत का?
प्राध्यापिका: नाही, दोघींचे स्वतंत्र,
विद्यार्थिनी: ही फी आहे का? पैसे काढायला भावाला सांगावे लागेल. कशाचे आहेत ते?
प्राध्यापिका: सगळं फोनवर नाही
बोलता येणार, व्हॉटस अॅप कॉल कर.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -