एक्स्प्लोर
ड्रायव्हरच्या मदतीने डॉक्टर तरुणीकडून आत्याला दोन कोटींचा गंडा
आत्याने मोठ्या विश्वासाने ताब्यात दिलेली प्रॉपर्टी हडपण्याचा तरुणीचा डाव होता. सुकेशिनी आणि चालक माटे यांनी संगनमत करुन वत्सला यांचे एटीएम कार्ड वापरुन तब्बल पाच लाख रुपये काढून घेतले.
औरंगाबाद : औरंगाबादेतील एका डॉक्टर तरुणीने परदेशात राहणाऱ्या आपल्याच आत्या आणि मामाला कोट्यवधींचा गंडा घातला आहे. वाहनचालकाच्या मदतीने सुकेशिनी येरमेने दोन कोटी रुपयांचा चुना लावला. औरंगाबाद शहरातील सिडको एन 4 भागातला अलिशान बंगलाही तरुणीने विकल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबादेतील एनआरआय डॉ. शिवाजी गुणाले आणि वत्सला गुणाले हे दाम्पत्य गेल्या सहा ते सात वर्षांपासून अमेरिकेत राहतं. त्यांचा सिडको एन 4 मध्ये बंगला आहे. सुकेशिनी ही वत्सला यांच्या भावाची मुलगी. ती बालपणापासून शिक्षणाच्या निमित्ताने गुणाले दाम्पत्याकडे राहत होती.
तीन वर्षांपूर्वी एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी तिने प्रवेश घेतला. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत गुणाले दाम्पत्याने सुकेशिनीच्या सोयीसाठी तिच्या ताब्यात बंगला दिला. सुकेशिनीला कॉलेजला नेणं-आणण्याची जबाबदारी कारचालक माटेवर सोपवली होती.
आत्याने मोठ्या विश्वासाने ताब्यात दिलेली प्रॉपर्टी हडपण्याचा तरुणीचा डाव होता. सुकेशिनी आणि चालक माटे यांनी संगनमत करुन वत्सला यांचे एटीएम कार्ड वापरुन तब्बल पाच लाख रुपये काढून घेतले. घरातील दागिनेही लंपास केले.
बंगला, रोख रक्कम आणि कारसह वाहनचालकासोबत पसार झालेली ही डॉक्टर तरुणी कोल्हापुरात घर भाड्याने घेऊन रहात होती. मुकुंदवाडी पोलिसांनी वाहनचालकासह या तरुणीला बेड्या ठोकल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement