एक्स्प्लोर

पंकजांच्या पतीच्या कारखान्यातून दुषित पाणी सोडल्याचा आरोप

औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये अमित पालवेंचा रेडिको मद्यार्क निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यातून कुंभेफळ गावात केमिकलयुक्त दुषित पाणी सोडलं जातं

औरंगाबाद : गावागावात स्वच्छता अभियान राबवण्याचा सल्ला देणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवेंच्या कंपनीनेच या अभियानाला हरताळ फासला आहे. पालवेंच्या रेडिको कंपनीतून केमिकलयुक्त दुषित पाणी सोडलं जात असल्याची तक्रार आहे. औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये अमित पालवेंचा रेडिको मद्यार्क निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यातून कुंभेफळ गावात केमिकलयुक्त दुषित पाणी सोडलं जातं. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी आणि आजार पसरत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. इतकंच नाही तर गावातल्या विहिरी, बोअरवेल्स आणि हातपंपातूनही लाल पाणी येतं. परिणामी इथली शेती नापीक झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे रेडिको मद्यार्क कंपनीतून निघणारं हे पाणी सुकना धरणात जातं. तिथून 10 ते 15 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. नागरिकांनी प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी केल्या. पण पंकजा मुंडेंच्या पतीचा कारखाना असल्यानं कारवाई होत नसल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे. रेडिको कंपनीनं मात्र ग्रामस्थांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते पावसाचं पाणी असल्याचं सांगून हात वर केले आहेत. रेडिको कंपनी सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. 2015 मध्ये शेतात केमिकल टाकल्याचा आरोप कंपनीवर झाला. त्यामुळे पिकांची नासाडीही झाली. आता पुन्हा एकदा दुषित पाण्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. गावा-गावात स्वच्छतेचं अभियान राबविणाऱ्या पंकजा मुंडेंनी या कारखान्याकडे लक्ष द्यावं, इतकीच मागणी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget