एक्स्प्लोर
शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याने 81 वर्षीय डॉक्टरवर तलवार हल्ला
औरंगाबादेतील 81 वर्षीय डॉक्टर पांडुरंग काळे यांनी शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून आरोपीने त्यांच्यावर तलवार हल्ला केला.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एकीकडे ऑनलाईन शस्त्र खरेदीमुळे खळबळ उडाली असतानाच शहरातील प्रसिद्ध डॉक्टरवर तलवार हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
81 वर्षीय डॉक्टर पांडुरंग काळे यांच्यावर शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तलवार हल्ला करण्यात आला. औरंगाबाद शहरात गादिया विहार भागात ही काल (गुरुवारी) घटना घडली.
काही दिवसांपूर्वी डॉ. काळे यांनी आपल्या घरासमोरील शेवग्याच्या शेंगा का तोडल्या, असा जाब आरोपी विजय साबळे याला विचारला होता. याचा राग मनात धरुन त्याने स्कूटरवरुन घरीच जाणाऱ्या डॉक्टरांवर तलवारीने हल्ला केला.
12 तलवारी, 13 चाकू, औरंगाबादेत फ्लिपकार्टवर शस्त्रखरेदी
हल्ल्यात डॉ. पांडुरंग काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पांडुरंग काळे हे शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत, तर त्यांचे पुत्र अशोक काळे उद्योगपती आहेत. काळे कुटुंब शहरातील अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबांपैकी आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
