एक्स्प्लोर
बारामती हॉस्टेलमध्ये घुसून पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न
पुणे: पुणे येथील बारामती हॉस्टेलमध्ये घुसून शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा तीन ते चार तरुणांनी प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तीन ते चार तरुण या हॉस्टेलमध्ये घुसून शरद पवारांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न करीत असताना हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. बारामती हॉस्टेल हे शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेचे हॉस्टेल आहे. पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांची याप्रकरणी अधिक चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, काल दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडावर केलेल्या भाषणात पवार कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी जानकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं. त्यामुळे या शाईफेक प्रकरणाला त्या वादाची किनार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement