एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

भरदिवसा घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

वसईत दोन अज्ञातांनी घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेचे फोटोही काढले. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

पालघर : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वसईमध्ये भरदिवसा राहत्या घरातच एका महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला घरात एकटीच असल्याचं पाहून दोन अज्ञातांनी घरात घुसून त्यांचा विनयभंग करत फोटो काढले. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून, शोधमोहीम सुरू केली आहे. भरदिवसा अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. पीडित महिला ही पाच महिन्यांची गरोदर असून पोलीस भरतीचे क्लास घेते. घटना घडली त्यावेळी संबंधीत महिलेच्या घरात इतर कोणीच कुटुंबीय नव्हते. पीडित महिलेचे विवस्र अवस्थेतले फोटोही आरोपींनी काढलेत. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिसरातील सीसीटीव्हींच्या आधारे पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नाशिकामध्ये अल्पवयीन गतीमंद मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न काय आहे प्रकरण? पीडित महिला ही पाच महिन्याची गर्भवती असून पोलीस भरतीचे क्लासेस घेतात. मात्र, रविवार असल्याने क्लासला सुट्टी होती. तर, पती कामावर गेले होते. त्यामुळे त्या एकट्याच घरी होत्या. त्यावेळी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान घराची बेल वाजली. दरवाजा उघडल्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी पती कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर ते कामावर गेल्याचे महिलेने सांगितले. मात्र, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, असे सांगत ते दोघे जबरदस्तीने घरात शिरले. त्यावर आज क्लासला सुट्टी आहे, तुम्ही उद्या या असं सांगितल्यानंतर पीडितेला धक्का देऊन तिचा विनयभंग केला. यावेळी तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करुन तिचे फोटोही काढले. घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. यवतमाळमध्ये लग्न समारंभात सफाई कर्मचाऱ्याकडून मुलीचा विनयभंग महिला सुरक्षेचा प्रश्न राज्यात गंभीर - काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट जळीतकांड घडल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता. या घटनेत एकतर्फी प्रेमातून एकाने प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. यात पीडिता गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. महिला सुरक्षेसाठी कडक कायद्या करण्याची मागणीही करण्यात येतेय. दरम्यान, आध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही कायदा आणण्याच्या हालचाली सुरू करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची माहिती दिली आहे. VIDEO | विवस्त्र होऊन मोटरसायकल चालवणारी 'ती' तरुणी कोण? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणीSonali Kulkarni on Election : यंदाची निवडणूक संभ्रमित करणारी, सोनाली कुलकर्णींनी दिला सल्लाMaharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Embed widget