एक्स्प्लोर

मेळघाटात तणाव वाढला, दगडफेक प्रकरणी 5 संशयित ताब्यात

याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई न केल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य वनरक्षक आणि वनपाल संघटनेनं दिला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनही दिलं आहे.

अमरावती :  मेळघाटातील सशस्त्र हल्लाप्रकरणात 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वनविभाग आणि आकोट पोलिसांवर दोन दिवसांपूर्वी काही स्थानिकांकडून हल्ला करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई न केल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य वनरक्षक आणि वनपाल संघटनेनं दिला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनही दिलं आहे. या हल्ल्यात 50 वन कर्मचाऱ्यांसह 15 पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, अमरावती जिल्हाधिकारी परिसरात आज तिसऱ्या दिवशीही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मेळघाटच्या जंगलात आदिवासींची वनअधिकाऱ्यांसह पोलिसांवर दगडफेक अमरावतीतील मेळघाटच्या जंगलात पुनर्वसित आदिवासी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांत टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. सरकारनं पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन अधिकारी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. यावेळी गावकऱ्यांनी सरकारी गाड्यांचीही तोडफोड केली होती. गावकऱ्यांच्या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. केलपानी-धारगड-गुल्लरघाट येथील गावकऱ्यांनी कुऱ्हाडी, कोयता, लाल मिरची पावडर टाकून हल्ला चढवला होता. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून या परिसरात कलम 144 लावण्यात आलं होतं. सरकारनं पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याचा आदिवासी गावकऱ्यांचा आरोप आहे. मेळघाटच्या अकोट वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या काही गावांचे 14 जानेवारी 2019 पासून पुनर्वसन झाले आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित गावांची शासनाकडून उपेक्षा झाल्याचा आदिवासींचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी मेळघाटातील आपल्या मूळ गावाकडे कूच करत केलपानी, गुल्लरघाट आणि धारगड येथील गावकऱ्यांनी मूळ गावांमध्ये प्रवेश केला होता. याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक अकोट आणि पोलीस अधिकारी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी आणि ज्या आंदोलनकर्त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी गेले होते. चर्चा शांततेत सुरु असताना काही आंदोलक हिंसक झाले आणि त्यांनी पोलीस आणि वनविभागच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरु केली. तसेच विळा आणि कुऱ्हाडींच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी शासनाच्या 15 गाड्यांची तोडफोड केली आणि जंगलाला देखील मोठ्या प्रमाणात आगी लावल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Raut: भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Pune Baramati Crime News: अर्थवला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अर्थवला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget