एक्स्प्लोर
नागपुरात भरदिवसा घरात घुसून मित्राकडून तरुणीवर तलवारीने वार
पोलिसांनी तरुणीवर हल्ला करणाऱ्या शुभम मरसकोल्हे याला अटक केली आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. क्राईम सिटी नागपुरातून गुन्हेगारीची आणखी एक भीषण घटना समोर आली आहे.

नागपूर : क्राईम सिटी अशी ओळख बनलेल्या उपराजधानी नागपुरात धक्कादायक घटना घडली. एका तरुणीवर तिच्या परिचयातील मित्राने भरदिवसा घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी तरुणीवर हल्ला करणाऱ्या शुभम मरसकोल्हे याला अटक केली आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी पीडित तरुणी ही तिच्या स्वतःच्या घरी बैठक खोलीत झोपलेली होती. तिचा मित्र शुभम हा अचानक घरात घुसला. सुरुवातीला अगदी नॉर्मल वाटत असलेल्या शुभमच्या मनात काय सुरु आहे याची कल्पना त्या तरुणीला नसल्याने ती बेसावध होती. दोघांमध्ये कुठल्या तरी मुद्द्यावर शाब्दिक वाद होऊन भांडण सुरू झालं. त्याच वेळी शुभमने त्याच्या शर्टमध्ये लपवून आणलेल्या तलवारीने तरुणीवर वार करायला सुरवात केली. पहिला वार पायावर केल्यानंतर आरोपीने दुसरा वार तिच्या मानेवर करण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी तरुणीने मध्येच हात आडवा केल्याने आरोपीचा वार चुकला. अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तरुणीने आरडा-ओरड सुरु केल्याने आरोपी शुभम घटनास्थळावरून पळून गेला. तरुणीच्या ओरडण्याने परिसरातील नागरिक एकत्रित झाले. घटनेची सूचना पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं समजतंय. पोलिसांनी आरोपीला अंबाझरी परिसरातून ताब्यात घेतलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















