एक्स्प्लोर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही: अशोक चव्हाण
धुळे: 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही. आघाडी सरकारमध्ये जसा राष्ट्रवादीचा तोटा झाला तसाच काँग्रेसचाही झाला.' अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
नंदुरबार-धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या चव्हाणांनी यावेळी प्रफुल्ल पटेलांसोबतच युती सरकारचाही समाचार घेतला. सोशल मीडियावर चालणारं सरकार ट्विटरवरील तक्रारींची दखल घेतं. पण शेतकऱ्यांकडे पाहायला त्यांना वेळ नाही. अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ठ लावलं अशी टीका प्रफुल्ल पटेलांनी केली होती.
गेल्या पाच वर्षात काँग्रेसबरोबर राहिल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान झालं. देशातील आणि राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व संपलं आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस स्वत:ही बुडाली आणि आम्हालाही घेऊन बुडाली. असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement