एक्स्प्लोर
वारी पंढरीची : तुकोबारायांची पालखी सराटी मुक्कामी, तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा नातेपुतेमध्ये मुक्काम
पंढरपुरातही आषाढी यात्रेनिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे.

सोलापूर : संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरहून निघून सराटी गावात मुक्कामाला असणार आहे, तर ज्ञानोबां माऊलींची पालखी वरड गावातून निघून नातेपुते गावात मुक्कामी असणार आहे. इंदापुरात काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील तुकाराम महाराजांच्या पालखीत पायी चालणार आहेत. तसंच हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिताने पालखीमध्ये सहभाग नोंदवला. दरम्यान पंढरपुरातही आषाढी यात्रेनिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे. वारकऱ्यांना 25 लाख लिटर मिनरल वॉटर देण्यात येणार आहे. तसंच वारकऱ्यांसाठी आठ किलोमीटरचं ग्रीन कार्पेटही टाकण्यात येणार आहे. इंदापुरातील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात तुकोबांचा दुसरा रिंगण सोहळा पार पडला. या रिंगण सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटलांची लेक अंकिता पाटील यांनी उपस्थिती लावली. इडा पिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येवो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























