एक्स्प्लोर
वारी पंढरीची : तुकोबांची पालखी आज बारामती मुक्कामी, तर ज्ञानोबांची पालखी लोणंदमध्ये विसावणार
संत तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम आज बारामतीमध्ये असेल, तर ज्ञानोबांची पालखी आज लोणंद मुक्कामी असेल.
पुणे : आषाढी एकादशीचे वेध लागलेल्या वैष्णवांची मादियाळी पंढरीच्या दिशेने विठूनामाच्या गजरात मार्गक्रमण करत आहे. संत तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम आज बारामतीमध्ये असेल, तर ज्ञानोबांची पालखी आज लोणंद मुक्कामी असेल.
तुकोबांची पालखी बारामतीमधून उद्या सकाळी प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर काठेवाडीमध्ये तुकारामाच्या पालखीचं पहिलं मेंढ्यांचं रिंगण पार पडेल. वाल्मिकी ऋषींची संजीवन समाधी असलेल्या वाल्हेमधून ज्ञानोबा माऊलींची पालखी सकाळी निघाली. दुपारी नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. त्यानंतर पालखीचा आजचा मुक्काम लोणंदमध्ये असणार आहे.
आळंदीहून जेंव्हा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान ठेवल्यानंतर सतरा मुक्काम करत हा पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचतो. यादरम्यान एकूण तीन वेळा माउलींच्या पादुकांना स्नान घातले जाते.
पहिल्यांदा इंद्रायणी नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते, त्यानंतर नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. पादुकांचं तिसरं स्नान पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये घातले जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement