एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये, उद्या मार्तंड खंडेरायाला भेटण्यासाठी जेजुरीकडे
सासवडचे एक वेगळे महत्त्व वारकऱ्यांसाठी आहे. ते म्हणजे माऊलीचे बंधू सोपान काकाची संजीवन समाधी याच सासवडमध्ये आहे. त्यामुळे या दिवशी माऊलींची पालखी सासवडला पोहोचते. त्याच दिवशी सोपानकाकांची पालकी सुद्धा पंढरपूरकडे मार्गक्रमण करते.
सासवड : आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे याच सासवडमध्ये माऊलींची पालखी दोन दिवस मध्ये काल आणि अजून मुक्कामी असते आणि इथून पुढे उद्या मल्हारी मार्तंड खंडेरायाला भेटण्यासाठी जेजुरीकडे प्रस्थान करेल.
सासवडचे एक वेगळे महत्त्व वारकऱ्यांसाठी आहे. ते म्हणजे माऊलीचे बंधू सोपान काकाची संजीवन समाधी याच सासवडमध्ये आहे. त्यामुळे या दिवशी माऊलींची पालखी सासवडला पोहोचते. त्याच दिवशी सोपानकाकांची पालकी सुद्धा पंढरपूरकडे मार्गक्रमण करते.
पुढे तोंडले-बोंडले याठिकाणी सोपान काका आणि माऊलींच्या पालख्यांची भेट होते. विशेष म्हणजे राज्यातून येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या सात ते आठ पालख्या आणि दिंड्या आहेत. त्यातली सगळ्यात शेवटी निघालेली पालखी सोपान काका यांची असते. आज सोपान काकांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं. महाराष्ट्र आणि राज्याबाहेरचे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने कूच करत आहेत.
तिकडे तुकाराम महाराजांच्या पालखीने आज दुपारचा विसावा लोणी काळभोरमध्ये घेतला आणि त्यानंतर आज रात्रीचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे. काल माऊलींच्या पालखीने पुणे सोडलं. त्यानंतर आता या दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement