एक्स्प्लोर

इतिहासामध्ये मंदिरे तोडणाऱ्यांची बाजू मुस्लिमांनी घेऊ नये : पद्मश्री के. के. मोहम्मद

अयोध्येत 1978 च्या काळात केलेल्या उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले होते. मात्र, ते सत्य समोर आणले गेले नव्हते. 1990 च्या काळात काही डाव्या इतिहासकारांनी जाणून बुजून अयोध्येत पुरातत्व विभागाला उत्खननात मंदिराचे कोणतेच पुरावे मिळाले नाही, असे सांगितले.

नागपूर : अयोध्या प्रकरणी काही लोकं पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना याचिका दाखल करुन काहीच मिळणार नाही. अशा नेत्यांना मुस्लिम समाजचं नाकारेल. सामान्य मुस्लिम अशा मुस्लिम नेत्यांमुळे त्रस्त झाला आहे, असे वक्तव्य भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक पद्मश्री के. के. मोहम्मद यांनी केले आहे. ते नागपुरात आयोजित मंथन मासिक व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. मोहम्मद यांनी 1978 मध्येच अयोध्येत झालेल्या उत्खननाच्या कामात प्रशिक्षणार्थी पुरातत्व अधिकारी म्हणून काम केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,  मान्य करा किंवा नाही मात्र, काही चुका प्राचीन काळी झाल्या आहेत. अफगाणिस्तानसारख्या देशातून आलेल्या मोहम्मद गजनी, मोहम्मद गोरीसारख्या हल्लेखोरांनी अनेक मंदिर तोडली. या ऐतिहासिक चुका मान्य केल्या पाहिजे आणि त्यांना योग्य ठरवण्याचा प्रयत्न करू नये, असेही मोहम्मद म्हणाले. तसेच त्या चुकांसाठी आताचे मुसलमान जबाबदार नाहीत. मात्र आताच्या मुस्लिमांनी सुद्धा इतिहासात मंदिरे तोडणाऱ्यांची बाजू घेऊ नये, असेही ते म्हणाले. अयोध्येत 1978 च्या काळात केलेल्या उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले होते. मात्र, ते सत्य समोर आणले गेले नव्हते. 1990 च्या काळात काही डाव्या इतिहासकारांनी जाणून बुजून अयोध्येत पुरातत्व विभागाला उत्खननात मंदिराचे कोणतेच पुरावे मिळाले नाही, असे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण वादाचे कारण बनले आणि माझ्यासारख्या अधिकाऱ्याला समोर येऊन तिथे मंदिर असल्याचे पुरावे असल्याचे म्हणावे लागले. आम्हाला तर 12 स्तंभ मिळाले होते. नंतरच्या काळात न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेल्या उत्खननात 50 पेक्षा जास्त स्तंभ आणि विवादित जागी मोठे राम मंदिर असल्याचे शिलालेखही मिळाले, असे के. के मोहम्मद म्हणाले. मोहम्मद म्हणाले की, नंतर न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे झालेल्या जीपीएस ( ग्राउंड पेनिट्रेटिंग सर्व्हे ) मध्येही मशिदीच्या खाली मोठे प्राचीन इमारतीचे अवशेष असल्याचे समोर आले. जसे मुस्लिमांसाठी मक्का मदिनासारखी धार्मिक स्थळं महत्वाचे आहेत. तसेच हिंदूंसाठी अयोध्येतील राम मंदिर महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले. अनेक मुस्लिम आधीच या वादग्रस्त स्थळावर दावा सोडून ते हिंदूंना देऊ इच्छित होते. मात्र डाव्या विचारसरणीच्या अनेक इतिहासकार आणि बुद्धिवंतांनी लोकांना भ्रमित करत वाद कायम ठेवले. पुरातत्व विभागाच्या रिपोर्टच्या आधारावरच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणात दिलेले निर्णय उत्कृष्ट निर्णय आहेत त्यापेक्षा अचूक निर्णय होऊच शकत नव्हते, असेही मोहम्मद यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget