एक्स्प्लोर
महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर
महाराष्ट्रातील राजेंद्र गुरव आणि भानुचंद्र पांडे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ४४ व्यक्तींना आज (बुधवार) ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील राजेंद्र गुरव आणि भानुचंद्र पांडे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जाहीर झाला आहे.
देशातील ४४ नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ७ जणांना हे पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाले आहेत. ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ ७ जणांना, ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ १३ जणांना आणि ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ २४ जणांना जाहीर झाले आहेत.
पुरस्काराचे स्वरुप पदक, प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरुपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधित राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
