एक्स्प्लोर
‘17 हजार स्क्रूं’चा वापर करुन साकारले शिवरायांचे चित्र
तब्बल 17 हजार स्क्रूंचा वापर करून तयार केलेली कलाकृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईत येत्या 12 ऑक्टोबरपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मुंबई-आर्ट-फेयर प्रदर्शनात तिच्या या चित्रा समावेश होणार आहे.

चंद्रपूर : चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील अभियंता युवतीने एका अनोख्या पद्धतीने थक्क करणारी कलाकृती साकारली आहे. तब्बल 17 हजार स्क्रूंचा वापर करुन युवतीने शिवाजी महाराजांचे चित्र तयार केले आहे. अंकिता नवघरे असं या तरुणीचं नाव असून तीने कुठल्याही कलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. सुमारे 40 किलो वजनाचे हे चित्र आहे. चित्र तयार करण्यासाठी कमी-अधिक लांबीच्या स्क्रूंचा वापर करावा लागला. याआधी अंकिताने वारली पेंटिंग, पॉइंटिलिझम, ऍबस्ट्रॅक्ट आर्ट, सिरॅमिक , म्युरल आदी कलाप्रकारातही आपले कौशल्य दाखविले आहे. तब्बल 17 हजार स्क्रूंचा वापर करून तयार केलेली कलाकृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईत येत्या 12 ऑक्टोबरपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मुंबई-आर्ट-फेयर प्रदर्शनात तिच्या या चित्राचा समावेश होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























