Nagpur News नागपूर : अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे विदर्भातील लढणारे नेते आहे. तशी ताकद तिथे जाणवते. अनिल देशमुख कधीही घाबरले नाहीत, अन्यायाच्या विरोधात ते कायम लढले. जो व्यक्ती स्वार्थापोटी अन्याय करतो. महाराष्ट्राचा राजकारण ज्या व्यक्तीमुळे अतिशय खालच्या पातळीवर गेलं, द्वेशाचे राजकारण केलं, समाजात जाती धर्मात तेढ निर्माण केला, अशा  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांच्या विरोधात अनिल देशमुख उभे राहत असतील तर महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचा त्यांना पाठिंबा असेल, तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो. एक लढवय्या नेता अशा अशा नेत्याच्या विरोधात लढेल त्याने महाराष्ट्राची वाट लावली. फक्त गुजरातचा विकास केला तर तिथे जनतेचाही पाठींबाच असेल, असा स्पष्ट मत राष्ट्रवादी शरद पवार गाटाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बोलताना व्यक्त केलंय.


उपराजधानीत आजी-माजी गृहमंत्री भिडणार? 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनिल देशमुख नागपूरमध्ये दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून लढतील अशा चर्चा आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्या ठिकाणी लढण्याबाबतचा अंतिम निर्णय अनिल देशमुख ठरवतील. पण फडणवीसांच्या मतदारसंघात गडकरी यांची लीड कमी झालीय. तिथे नाराजी आहे. नागपूरात विकास बंद करा, यासाठीही नागपुरात आंदोलन होत आहे. त्यामुळे नागपुरातील जनतेचा रोष स्पष्ट असल्याचेही आमदार रोहित पवार यांनी बोलताना व्यक्त केलंय.


अनिल देशमुख फडणवीसांना चांगलं चॅलेंज ते देतील


अनिल देशमुख यांना सोपा मार्ग होता, तो म्हणजे त्यांच्या पक्षात जायचं की, जेलमध्ये जायचं. काही लोक भितीनं गेले. अनिल देशमुख ईडीला घाबरले नसलतील, तर मग ज्यांनी राजकारण खराब केलं त्या फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण- पश्चिममधून अनिल देशमुख  लढणार असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतोय. अनिल देशमुख उभे राहीले तर ते फडणवीस यांना चांगलं चॅलेंज ते देतील. असा विश्वासही रोहित पवार यांनी बोलताना व्यक्त केलंय.


कर्जत जामखेडला मी सोडणार नाही- रोहित पवार


पार्थ पवार मोठे नेते आहेत. ते फक्त माझ्याच मतदारसंघात फिरतील असेल असं नाही. ते राज्यभर फिरू शकतात. त्यांचा पक्ष वेगळाआहे. मोठ्या नेत्यांबाबत आपण काय बोलणार. माझ्या विरोधात कोणी उभं रहावं, मतं खाण्यासाठी कितीही जणांना उभं करावं. पण तिथल्या जनतेवर माझा विश्वास आहे. कर्जत जामखेडच्या लोकांनी आम्हाला लढायला शिकवलंय. कर्जत जामखेडला मी सोडणार नाही. तिथूनंच लढणार आणि गेल्यावेळेसपेक्षा जास्त लिड मिळेल, असा विश्वासही रोहित पवार यांनी बोलताना व्यक्त केलंय.


माझ्या महिला मेळाव्यात प्रेमाने सर्व बहिणी आल्या होत्यां, मोदीजींच्या मेळाव्यात 500 रुपये देऊन महिलांना आणलं होतं. मोदीजी यांनी सांगितलं महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका. त्या व्यक्तिला जो कोणी मदत करत असेल त्याला सोडू नका. याचा अर्थ असा की, मोदी साहेबांचा या सरकारवर विश्वास राहीला नाही. मोदी साहेबांनीच सांगितलं महायुतीच्या नेत्यांचं खरं नाही. त्यामुळे इथे बदल होणार, असेही ते म्हणाले. 


हे ही वाचा