Rohit Pawar on Dhananjay Munde : परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गिते फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणावरुन आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी सातत्याने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली आहे. परळीत धनंजय मुंडेंचे मास्टरमाईंड आहेत. वाल्मिक कराड नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे . धनंजय मुंडे आमदार असले तरी त्यांच्या मतदारसंघात त्यांचे काहीच चालच नाही, तिथे सर्व दहशत ही वाल्मिक कराडची आहे
परळची जनता अतिशय साधी आणि प्रामाणिक आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते असले तरी त्यांचे काही चालत नाही. वाल्मिक कराडची त्या भागात मोठी गुंडागर्दी आहे. तो कोणालााही जुमानत नाही. परळी जरी आमदार धनंजय मुंडेंची असली तरी त्यांचे त्या मतदारसंघात काहीच चालत नाही. वाल्मिक कराडचे त्या मतदार संघात चालते. छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी त्रास दिला जातो. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल जातो. यंत्रणेचा गैर वापर करतात.कराड यांची दहशत आता धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर गेले आहे. निवडणूक काळात ज्यांनी बूथ कॅप्चरिंगचे व्हिडीओ समोर आले. त्यांचे जीव आता धोक्यात आहे. त्यामुळे आता हे थांबायल हवे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी.
पिंपरी चिंचवडला निधी आतापर्यंत शरद पवारांनी दिला : रोहित पवार
पिंपरी चिंचवडच्या विकासावर रोहित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास झाला त्याला निधी शरद पवार यांनी दिला. अजित दादांवर विश्वास दाखवत तो निधी पवार साहेबांनी दिला होता. पिंपरी चिंचवडला निधी आतापर्यंत पवार साहेबांनी दिला आहे. अजित दादांनी आता फंड तिकडे दिला, 10 वर्ष बजेट मांडताना त्यांनी निधी दिला . लोकसभेचा निकाल बघून घाबरून 42 गावांना त्यांनी निधी दिला. महाराष्ट्रात जो निकाल लागला त्याला घाबरत सरकारला या योजना द्याव्या लागल्या, त्यामुळे याचे क्रेडिट या जनतेला द्यावे लागेल, त्यात पण काही त्रुटी आहे त्या दूर कराव्या लागतील.
अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले....
राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही पार्टी बदलली नाही अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे, या अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले, आरोप ज्यांनी केले त्यांच्या सोबत जाऊन आपण बसणार तर त्याचा अर्थ काय निघतो. लोकांच्या बाजूने लढणारे लोक आता पाहिजे. दादा भाजप सोबत गेले. पक्ष महत्त्वाचा आहे पण विचार पण महत्त्वाचा आहे. जो विचार त्यांनी 35 वर्ष जपला तो त्यांनी भाजप सोबत जाऊन सोडला. ज्यासाठी त्यांनी विचार सोडला, त्याच भाजपने त्यांच्यावर खोटे आरोप केले.