एक्स्प्लोर

देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात, नववधूसह सासूचा मृत्यू

मारेगावजवळ मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर इथल्या महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत येत असताना, मारेगावपासून एक किमी अंतरावर अक्षरा रेस्टॉरंटजवळ हा अपघात झाला.

यवतमाळ :​ यवतमाळमधील मारेगावजवळ देवदर्शनावरुन परत येताना ट्रक आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात नववधूसह तिघींचा मृत्यू झाला आहे. तर नवरा (देवा उपरे) याच्यासह सात जण जखमी आहेत. गाडीतील सर्व हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी आहेत. साक्षी देवा उपरे (वय 19 वर्ष) असं नववधूचं नाव आहे. तर लक्ष्मी उपरे (सासू, वय 50 वर्ष), सानिका भोपाळे (वय 14 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. मारेगावजवळ मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर इथल्या महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत येत असताना, मारेगावपासून एक किमी अंतरावर अक्षरा रेस्टॉरंटजवळ हा अपघात झाला. VIDEO | देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात, नववधूसह तिघांची मृत्यू | यवतमाळ | एबीपी माझा हे नवदाम्पत्य लग्नानंतर चंद्रपूरच्या महांकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास करत असताना मारेगाव इथल्या अक्षरा रेस्टॉरंटजवळ, यवतमाळहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने क्रुझर गाडीला जोरदार धडक दिली. यात क्रुझर गाडी रोडवरुन तीन पलटी खात रस्त्याच्या बाजून गेली. हा अपघात इतका भीषण होता की यात दोघींचा जागीच मृत्यू झाला तर एकीची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी नागपूरला रवाना करण्यात आलं आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

Embed widget