एक्स्प्लोर

चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाडांवर 'अमूल'चा चित्रातून निशाणा

मुंबई : एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवी गायकवाड एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहेत. दुध उत्पादनातील प्रसिद्ध ब्रँड 'अमूल'नं चित्राच्या माध्यमातून गायकवाडांवर निशाणा साधलाय. अमूलनं हे चित्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे. आपल्या खुमासदार जाहिरात चित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमूलनं खासदार रवींद्र गायकवाड यांचं चित्र पोस्ट केलं आहे. यात इकॉनॉमी क्लासऐवजी अब्यूजनेस क्लास असा उल्लेख करण्यात आला आहे. रवी गायकवाडांचं चप्पल काढलेलं व्यंगचित्र सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलं आहे. https://twitter.com/Amul_Coop/status/845605026089324545 अमूल आपल्या जाहिरातींसाठी अशा प्रकारची व्यंगचित्र वृत्तपत्र, होर्डिंग्स, सोशल मीडियातून वापरतं. या चित्रांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करतं. आज अमूलनं पोस्ट केलेलं हे चित्र सर्वांचंच लक्ष वेधत आहे. काय आहे प्रकरण? उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला. VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे. … म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड ‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली. गायकवाड यांची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली. पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कानउघडणी केली. शिवसेनेकडून जाब शिवसेना पक्षाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांना अधिकृत जाब विचारण्यात आला होता. दिल्ली विमानतळावर एअर इंडिया विमानात घडलेल्या प्रकाराबद्दल खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांची बाजू शिवसेना पक्षाकडे मांडली आहे. पक्षाने त्यांना या घटनेसंदर्भात समज दिलेली आहे. शिवसेनेची पहिला प्रतिक्रिया गायकवाडांनी हिंसक होणं योग्य नसल्याचं मत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ‘गायकवाड यांनी असं करायला नको होतं. ते लोकप्रतिनिधी आहेत. खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, कोणी इतक्या पटकन हिंसक होणं योग्य नाही.’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. ‘या प्रकरणात कोणाची चूक आहे, हे पाहायला हवं. कोणी सुरुवात केली, हे बघणं महत्त्वाचं आहे’ असंही शिंदे म्हणाले. गायकवाडांवर कारवाई करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले. गायकवाड यांचा उद्दामपणा आपल्याकडे एअर इंडियाचं तिकीट असून एअर इंडियाच्या विमानातूनच प्रवास करणार असल्याचं रवींद्र गायकवाडांनी स्पष्ट केलं होतं. तसंच मोदींचा एकेरी उल्लेख केल्यामुळंच आपण मारहाण केल्याचा दावा गायकवाडांनी केला. मात्र एअर इंडियाने गायकवाड यांचं विमान तिकीटच रद्द केलं. भारतीय विमान संघाची बंदी भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली आहे. जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली आहे. भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे. कोण आहेत रवींद्र गायकवाड? – रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत – लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला. – उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत – रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते. – दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे. – तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.

संबंधित बातम्या

गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार

लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे

पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड

एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार

… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड

शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget