एक्स्प्लोर

IPS Krishna Prakash : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं पुन्हा वेशांतर करुन यशस्वी स्टिंग ऑपरेशन, पण....!

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (pimpri chinchwad police commissioner krishna prakash)यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून स्टिंग ऑपरेशन केलं. याची सध्या खूप चर्चा होतेय

पिंपरी चिंचवड : आयर्नमॅन अशी ओळख असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (pimpri chinchwad police commissioner krishna prakash)यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून स्टिंग ऑपरेशन केलं.  यावेळी त्यांच्या नावाचा वापर करुन अनेक गैरव्यवहार करणारा आणि खंडणी मागणाऱ्याला बेड्या ठोकण्यासाठी कृष्ण प्रकाशांनी वेशांतर केलं होतं. या कौतुकास्पद कारवाई वेळी काही ठराविक पत्रकार ही तिथं पोहचले होते. कारवाईसाठी केलेल्या वेशभूषेत पोलीस आयुक्त प्रकाश यांनी फोटोसेशनही केलं. आरोपीला बेड्या ठोकण्यात यश येताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश मिशिवर ताव मारायलही विसरले नाहीत. 

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांचे नाव ऐकून भल्याभल्यांना घाम फुटतो. याच नावाचा फायदा घेण्याचं नाशिकच्या रोशन बागुलने ठरवलं. यासाठी रोशनने बनावट आयडी कार्ड बनवलं होतं. एका बाजूस महाराष्ट्र पोलीस असा तर दुसऱ्या बाजूला सायबर क्राईमचा उल्लेख होता. त्यावर रोशनचा फोटोही होता. हेच आयकार्ड दाखवून त्यानं पिंपरी चिंचवडमधील एका घर मालकाला धमकावले. तर दुसऱ्या व्यक्तीला जमिनीचा व्यवहार करून देतो असं म्हणाला.

या दोन्ही प्रकरणात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी ओळख असल्याचं तो म्हणाला. जमीन व्यवहारात त्यांनी मदत केली नाही तर त्यांचे बॉस विश्वास नांगरे पाटलांकडून करून घेऊ, असं आश्वासनही त्यानं दिलं. यासाठी पैशाची मागणी रोशनने केली. ही बाब पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांच्या कानावर पडली. मग त्याला धडा शिकविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेशांतर करायचं ठरवलं. 

त्यानुसार पोलीस आयुक्त प्रकाशांनी सामान्य व्यक्तीची वेशभूषा केली. मग निगडीतील एका हॉटेलमध्ये रोशनला बोलविण्यात आले. तिथं स्वतः कृष्ण प्रकाश सामान्य व्यक्तीच्या वेशभूषेत दाखल झाले. सगळी बोलणी झाली, पैसे ही द्यायचे ठरले. पण वरची नोट वगळता खालच्या सर्व नोटा नकली असल्याचं कळताच रोशनचे बिंग फुटले. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. रोशनला अटक करताच आयर्नमॅन पोलीस आयुक्त प्रकाशांनी मिशिवर ताव हाणला. या प्रकरणी रोशनसह गायत्री बागूल आणि पूजा माने अटकेत आहेत. तर अन्य दोघांचा शोध सुरु आहे. 

या स्टिंग ऑपरेशनसाठी कृष्ण प्रकाशांनी जी वेशभूषा केली होती, त्याचं फोटोसेशन ही करण्यात आलं. कौतुकास्पद कारवाई असल्याने फोटो सेशन करण्यात काहीच गैर नव्हतं. अगदी स्टिंग ऑपरेशन यशस्वी झालं तेव्हा काही ठराविक पत्रकारही तिथं पोहचले. त्यांनी हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. तेव्हा मिशिवर ताव मारायला कृष्ण प्रकाश विसरले नाहीत. 

याआधीही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांनी वेशांतर केलं होतं. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणि नाके बंदीवर जाऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यावेळी एक पत्रकार सोबत होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश वेशांतर करून आधी पोलिसांची परीक्षा घेतली तर आता थेट आरोपींच्या मुसक्या आळवल्या. त्यामुळे या गोष्टीचं कौतुक आणि अनुकरण ही नक्कीच करायला हवं. पण ते वेशांतर करून स्टिंग ऑपरेशन करत असतानाच प्रसारमाध्यमं तिथं कशी काय पोहचतात? अशी चर्चा ही शहरात रंगली आहे. 

इतर संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget