Sharad Pawar on BJP : घाबरु नका, राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही : शरद पवार
Sharad Pawar on BJP : घाबरु नका, राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असं वक्तव्य युवा आमदारांच्या बैठकीत शरद पवार यांनी केलं आहे.
Sharad Pawar on BJP : राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) युवा आमदारांनी काल (गुरुवारी) शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
देशात काही दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या निकालांमध्ये पाचपैकी चार राज्यांत एकहाती सत्ता मिळवली, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं बाजी मारली. याच निवडणुकांच्या निकालांबाबत युवा आमदारांनी शरद पवारांसमोर आपापले प्रश्न मांडले. त्यानंतर बैठक संपल्यानंतर ज्यावेळी सर्व आमदार जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शरद पवार उभे राहिले, त्यांनी दोन्ही हात उंचावले आणि आपल्या हाताची मुठ बंद करुन म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही.
भाजपच्या नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही : शरद पवार
भाजप जरी आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला, तरी भाजपमधील काही नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही आहे, असं शरद पवार युवा आमदारांशी बोलताना म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे, दिवसाला 24 तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यांसारखे अनेक गुण आहेत. जे भाजप नेत्यांकडून शिकण्याची गरज आहे. त्यासोबतच शरद पवारांनी युवा आमदारांना को-ऑपरेटिव्ह सेक्टर आणि सामाजिक क्षेत्रांशी जोडण्याचाही मंत्र दिला आहे.
महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : देवेंद्र फडणवीस
नागपुरात महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं गोव्यात सत्ता मिळवली. त्यानंतर प्रथमच नागपुरात आलेल्या फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात स्वागत केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- शिर्डीमध्ये 17 ते 22 मार्च प्रतिबंधात्मक आदेश लागू, गुरुवारच्या पालखीसह रथोत्सवाला स्थगिती
- MNS vs Shiv Sena : होळीच्या निमित्ताने मनसेकडून शिवसेनेवर टिकेच्या रंगाची उधळण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha