पवारांचा डाव, भाजपला घाव! 3 बडे नेते 'शिवरत्नवर' एकत्र येणार, माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार
उद्या अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी भोजनासाठी येणार आहेत.
Madha loksabha Election : माढा लोकसभेच्या (Madha Loksabha) दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपनं (BJP) माढ्यातून रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Nimbalkar) पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. तर भाजपमध्ये नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी (dhairyasheel mohite patil) शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार गटाकडून मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर तीन बडे नेते एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी सकाळी भोजनासाठी येणार आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णाय घेतल्यानंतर वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्या शरद पवारांसह सुशीलकुमार शिंदे हे सकाळी भोजनासाठी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी येणार आहेत. या डिनर डिप्लोमसीमुळं माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं समीकरण सोपं होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे भोजनासाठी अकलूज येथे येणार आहेत. यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
उद्या धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर मोहिते कुटुंबातील सदस्य हे उद्या दुपारी चार वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे उपस्तित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. कारण ते सकाळी जेवणासाठी येणार आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहेत.
माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय वाढणार
दरम्यान, या डिनर डिप्लोमसीमुळं माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय वाढणार आहे. सुरुवातीपासून जयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडे जाण्यामुळं माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता. उद्याच्या डिनर डिप्लोमसीसाठी सुशीलकुमार शिंदे हेही येत असल्यानं सोलापूर लोकसभा जागेवर प्रणिती शिंदे यांना फायदा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
महत्वाच्या बातम्या: