Government Ayurvedic College : आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये कपात; 249 पैकी फक्त 160 जागांवरच होणार प्रवेश
राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये 89 जागांची कपात केल्याची माहिती उघडकीस आली असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे.
Government Ayurvedic College Nagpur Admission : लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यापासून तर रक्ताने माखलेल्या जखमेवर नेमका पालापाचोळा लावून रुग्ण बरा करण्याची ताकद आयुर्वेद शास्त्रात आहे. आरोग्याची गुरुकिल्ली आहे तर 'आजीबाईचा बटवा' अशी या शास्त्राची ओळख आहे. यामुळेच केंद्र शासन 'आयुष'च्या माध्यमातून आजीबाईच्या बटव्याकडे विशेष लक्ष देते. दुसरीकडे राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये 89 जागांची कपात केल्याची माहिती उघडकीस आली. राज्यातील 249 पैकी फक्त 160 जागांवरच प्रवेश होणार आहेत.
राज्यात नांदेड, उस्मानाबाद, मुंबई, नागपूर आणि जळगाव महाविद्यालये आहेत. नुकतेच भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने महाराष्ट्रातील या सर्वच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांचे पोस्टमार्टेम केले असता, मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांच्या रिक्त जागा असल्याचे आढळले. याशिवाय हॉस्पिटल कर्मचारी, रुग्णखाटांचा अभाव असल्याचे वास्तव पुढे आले. यामुळे पाचही शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवीच्या 563 आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 264 जागांचे प्रवेश थांबवले होते.
आयुर्वेद शास्त्रात एमडी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष
आयुष विभागाचे संचालक आणि महाराष्ट्र शासन यांनी न्यायालयात जागा भरण्यासंदर्भातील शपथपत्र सादर केल्यानंतर भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने प्रवेशबंदी उठवली. मात्र शासनाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीची कंत्राटी प्रवेश प्रक्रिया सुरु केली. यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमात (एमडी) च्या जागांवर महाविद्यालयात पदव्युत्तर (एमडी) अभ्यासक्रमाच्या 264 जागा होत्या. मात्र भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने 249 जागा भरण्यास परवानगी दिली. यापैकी 89 जागा कमी करण्यात आल्या. यामुळे आयुर्वेद शास्त्रात एमडी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 160 जागांना परवानगी दिली. शपथपत्रानुसार भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाद्वारे दिलेल्या 249 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. रवींद्र बोथरा, डॉ. मोहन येंडे, डॉ. राहुल राऊत, डॉ. शांतिदास लुंगे यांनी केली.
या महाविद्यालयांच्या जागांमध्ये कपात
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय | पदव्युत्तरच्या एकूण जागा | कमी केलेल्या जागा | शिल्लक जागा |
मुंबई शासकीय आयुर्वेद महाविद्यालय | 56 जागा | 11 जागा | 45 जागा |
उस्मानाबाद शासकीय आयुर्वेद महाविद्यालय | 60 जागा | 33 जागा | 27 जागा |
नागपूर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय | 75 जागा | 37 जागा | 38 जागा |
नांदेड शासकीय आयुर्वेद महाविद्यालय | 58 जागा | 8 जागा | 50 जागा |
ही बातमी देखील वाचा...
नागपूर जिल्हा परिषदेचे 107 कोटी राज्य सरकारकडे अडकून! काँग्रेसची सत्ता असल्याने मुख्यमंत्र्यांनी भेट टाळल्याचा आरोप
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI