Raj Thackeray LIVE : राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार : राज ठाकरे
Raj Thackeray Aurangabad Rally Sabha Live : राज ठाकरेंच्या आज औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे आपण जात पात मानत नसाल तर विषमतेचे प्रतीक असणारी मनुस्मृती जाहीररित्या जाळून दाखवा, असे सचिन खरात म्हणाले आहेत.
सरळ मार्गाने समजत नसेल तर मग महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद दाखवण्याची वेळ आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Speech Live : 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.
लाऊडस्पीकरचा हा मुद्दा जुना आहे. माझ्याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे. मी मशिदीवरच्या भोंग्याला हनुमान चालीसाचा फक्त त्याला पर्याय दिला आहे. मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.
मी कोणतीही जात मानत नाही. अठरा पगड जातीमध्ये विष तुम्ही कालवले. हे विष आता शाळा- कॉलेजांमध्ये पोहचले आहे.उदात्त विचार देणारा महाराष्ट्र हा जातीमध्ये सडतोय, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray on Sharad Pawar : पवार साहेबांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे पण त्याआधी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.
Raj Thackeray Speech Live : रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली : राज ठाकरे
शरद पवार नास्तिक आहे हे म्हटल्यावर त्यांना झोंबले. त्यानंतर देवाचे, पूजेचे फोटो बाहेर काढले. परंतु शरद पवारांच्या कन्येने स्वत: लोकसभेत याची कबुली दिली आहे.
आज संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास विसरलो. आम्ही महापुरुषांच्या जन्मतिथी आणि पुण्यतिथी साजरी करत आहे. ज्या दिवशी या समाजाच्या अंगात शिवाजी येईल तेव्हा संपूर्ण जग पांदक्रांत करता येईल, असे आंबेडकर म्हणाले : राज ठाकरे
छत्रपतींचा जन्म झाला महाराष्ट्रचं दार उघडलं. स्वाभिमानाने कसं जगायचे हे आमच्या राजानं शिकवले आहे. केवळ 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी भव्य काम केले : राज ठाकरे
जे इतिहास विसरले आहे त्यांचा भूगोल सटकला आहे : राज ठाकरे
Raj Thackeray Speech Live : संभाजीनगर हा महाराष्ट्राचा मध्य आहे. यापुढील माझ्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले
महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Live: : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औंरगाबाद येथील सभेला सुरुवात झाली आहे.
राज ठाकरे सभास्थळी दाखल झाले आहेत.
कोणत्याही क्षणी राज ठाकरे सभास्थळी दाखल होणार आहेत. प्रवेशद्वारवरील गर्दी कमी करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे.
सभास्थळी पोलिसांची कडेकोड सुरक्षा आहे. व्हीआयपी गेटबाहेर शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
Raj Thackeray : राज ठाकरे सभा स्थळी रवाना झाले आहेत.
सभा स्थळा बाहेर गर्दी अनावर झाली आहे. बॅरिकेट्स ढकलून कार्यकर्ते आतमध्ये जात आहेत.
राज ठाकरेंच्या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात औरंगाबादेत 'राज गर्जना' होणार आहे.
मनसे नेते राज ठाकरेंच्या सभेला शंख नाद करून थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेत 15 ते 30 वर्षाच्या तरुणांचा मोठा सहभाग असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मनसेचे नेते सलीम शेख सभास्थळी दाखल झाले आहेत. ठाण्यातील सभा गाजविल्यानंतर औरंगाबादमध्येही सलीम शेख यांची तोफ धडाडणार आहे.
राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा तयार झाला असून थोड्याच वेळात ते सभास्थळी रवाना होणार आहेत.
सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाण्यासाठी युवकांचे लोंढे रवाना होताना पाहायला मिळत आहेत. साधारण सभा स्थळापासून एक किलोमीटर अंतरा वरून सभा स्थळाकडे पायी निघत आहेत.
राजकारण जाणार नाही,मात्र जो पर्यंत राज, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालतील तोपर्यंत त्यांना साथ देणार असे मत आदिशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गौरी कुलकर्णी यांनी मांडले आहे.
तरुण विद्यार्थ्यांसोबत अनेक तरुणींनीदेखील सभेला उपस्थिती लावली आहे. राज यांनी हिंदुत्ववाची भूमिका घेतल्यामुळेच तरुण विद्यार्थी त्यांच्यासोबत आहेत.
राज ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होणार आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सभास्थळी पोहोचत आहेत.
राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसा पठणाला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं समर्थन नाही. बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी होणार या केवळ अफवा असल्याचे मत विनोद बन्सल यांनी मांडले आहे.
भोंग्यासंदर्भात राज ठाकरे यांनी आवाज उठवल्यानंतर मनसे मधील अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तरीही आजच्या राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेमध्ये मुस्लीम युवकांनी सुद्धा सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरानजीक असलेल्या वाळूज परिसरातून पाचशे युवक बाईक रॅली घेऊन या सभेमध्ये सहभाग घेण्यासाठी आले आहेत. या बाईक रॅलीमध्ये मुस्लिम युवकांचादेखील मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे हेच बाळा साहेबांचे खरे वारसदार आहेत. बाबरीच्या वेळेला राज साहेबांनीच आम्हाला कारसेवक म्हणून अयोध्याला पाठवलं होतं, असे मत राज ठाकरे यांनी मांडले आहे.
तरूण विद्यार्थी राज ठाकरेंच्या सभेकडे रवाना झाले आहेत. राज यांचा हिंदुत्ववादी विचार या तरुणांनाच भावतो आहे. बॅकिंग परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचादेखील यात समावेश आहे.
राज ठाकरे यांच्या आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना परभणीचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे राज ठाकरे आणि भाजपवर चांगलेच बरसले आहेत राज ठाकरे हे भाजपचे पपेट आहेत भाजपला बोलता येत नसल्याने भाजपने त्यांना पुढे करून बोलायला लावत असल्याचा घणाघाती आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद येथील राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. मात्र, त्या अगोदरच मुंबई पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून औरंगाबादच्या दिशेने निघालेले भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घाटकोपर चिराग नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Raj Thackeray : आज संध्याकाळी औरंगाबाद येथे होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेवर पोलिसांची करडी नजर असून दुसरीकडे या सभेसाठी येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर देखील पोलीस नजर ठेवून आहेत. बीड जिल्ह्यातील केजमधून काही कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबादकडे जात असताना त्यांच्या गाड्या केजमध्ये पोलिसांनी तपासल्या आहेत. या गाड्या तपासण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग लावले असून या गाड्यांमध्ये काही शस्त्र किंवा इतर साहित्य आहे का? हे पोलीस तपासत आहेत.
पोलिसांच्या या तपासणी मोहिमेचा मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. राज्य सरकारच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्याचं काम करू नये. या सभेला गर्दी होऊ नये यासाठी पोलीस आणि राज्य सरकार दबावतंत्राचा वापर करत आहे, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Nagpur Maharashtra Din : नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले...
यावेळी नागपूर शहर पोलीस दलातील पुरुष व महिला पथक, नागपूर ग्रामीण पोलिसांचे पथक, राज्य राखीव पोलीस दल, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक पथक, गृह रक्षक दल अशा विविध पथकांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली ..
यावेळी पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्यावतीने वर्षभरात नागपूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला... तसेच विविध प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची स्तुती केली...
औरंगाबादमध्ये राज ठाकरे थांबणार असलेल्या हॉटेल बाहेर उभी असलेली राज्यपालांची गाडी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांना हटवन्यास भाग पाडलं.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधांसभेतून 800 मन सैनिक औरंगाबादबाद साठी रवाना झाले आहेत. तर यवतमाळ जिल्यातून 3000 मनसैनिक सभेसाठी जाणार आहेत.
Raj Thackeray LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी पुण्याहून औरंगाबादला जाताना त्यांचे अहमदनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसे सैनिक जमले होते. दरम्यान गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. गर्दी पाहून राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले.
Ahmednagar News : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंग्यांचा मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या सभा तसंच मशिदीवरील भोंगा उतरवण्याबाबत दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र अशा नोटीस किंवा तडीपारीला आम्ही जुमानत नाही असं मनसेचे कार्यकर्ते सांगत आहेत.
Raj Thackeray LIVE : राज ठाकरे अहमदनगर येथे दाखल, हॉटेल स्वीट होममध्ये जेवणाची व्यवस्था, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
Raj Thackeray LIVE : औरंगाबाद : अमित ठाकरे यांच्याकडून भोंगे लावलेल्या प्रचार रिक्षांचा शुभारंभ, संदीप देशपांडे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सभेचा प्रचार करणाऱ्या रिक्षांचा नारळ फोडून शुभारंभ
Raj Thackeray LIVE : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं शिरुरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. औरंगाबादला जाण्यापूर्वी अहमदनगरच्या स्वीट होम या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबणार असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हॉटेल प्रशासनाकडून देखील पूर्ण तयार झाली आहे.
Raj Thackeray LIVE : राज ठाकरेंचा ताफा वढू गावात दाखल. थोड्याच वेळात छत्रपति संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचतील.
आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं की, राज ठाकरे यांची लाव रे तो व्हिडिओची भूमिका सरड्यासारखे रंग बदलते. पूर्वी भाजपाचे लावत होते आता पाहुयात औरंगाबादमध्ये कोणाचे लावतात. झुल घातल्याने कोणी वाघ होत नाही. असे सर्कशीतले वाघ येतात आणि जातात. शेर तर एकच बाळासाहेब ठाकरे. बॅनर लावले आहेत त्यात तुलना होऊ शकत नाही हे सांगण्यात आले. इम्तियाज जलील यांनी आधी आमच्या सणांना यावं त्यानंतर इफ्तार पार्टीला जायचं का नाही त्याचा विचार करू.
सचिन खरात यांनी म्हटलं की, माननीय राज ठाकरे वढू येथील संभाजी राजे यांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहे असं समजते. भाजपाचे लोक सूद्धा आपल्या वर पडलेला जातीवादाचा शिक्का पुसण्यासाठी दिक्षा भूमीला जातात तसे राज ठाकरे यांनी करू नये आणि आता तिथे जाऊन संभाजी राजे विचार आत्मसात करावे आणि तेच विचार औरंगाबाद येथील सभेत मांडावे म्हणजे देश एकसंघ राहील तसेच राज ठाकरे यांनी जवळच भीमा कोरेगाव येथील असणाऱ्या विजयस्तंभास भेट दयावी आणि एक जातीचे पुरस्कर्ते आहात हा शिक्का पुसावा.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथे सभेसाठी जाताना अहमदनगर मार्गे जाणार आहे. अहमदनगर येथे माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करून औरंगाबादकडे जाणार आहे.
उद्या म्हणजे एक मे च्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद मध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि या जाहीर सभेला बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी जाणार आहेत यासाठीची तयारी मनसे पदाधिकारी करताना पाहायला मिळत आहेत..
औरंगाबाद शहरामध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे त्या औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी या सभेला येतील असे नियोजन करत आहेत.. बीड जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका चालू आहेत.
Raj Thackeray LIVE : राज ठाकरे यांच्या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची उद्या सभा होतेय. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागलीय.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेमुळे मनसे विरुद्ध शिवसेना संघर्षाची झलकही पाहायला मिळतेय. हिंदुत्वावरून दोन्ही पक्षांत स्पर्धा सुरु झालीय. त्यामुळे मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून शिवसेनेला उत्तर दिलंय. खरे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत. औरंगाबादमधल्या 10 चौकांत मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून उत्तर दिलंय. विशेष म्हणजे राज ठाकरे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेणार आहेत. त्याच मैदानात लवकरच सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार आहेत.
राज ठाकरे पुण्यातून निघाल्यानंतर जवळच असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधी ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुढे औरंगाबादकडे रवाना होतील. औरंगाबादच्या सभेआधी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाण्याचा निर्णय घेऊन राज यांनी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याची मागणी अनेक वर्षापासून होतेय. त्यावरून राजकारणही रंगलंय. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधल्या सभेत राज ठाकरे हा मुद्दा उपस्थित करणार का याचीही उत्सुकता आहे. राज यांच्या वढू दौऱ्याकडे त्यादृष्टीनं पाहिलं जातंय.
राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा असणार आहे. पुणे ते औरंगाबाद दरम्यान राज ठाकरे यांच्या जागोजागी स्वागताची तयारी मनसैनिकांनी केलीय. राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक टीझर मनसेनं प्रसिद्ध केलाय.
औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पार पडणार आहेत. राजमहाल इथं १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत हे विधी पार पडतील. शेकडो गुरुजी राज ठाकरे यांना शुभ आशीर्वाद देतील. त्यानंतर राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होतील. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही नेते औरंगाबादच्या दिशेने निघणार आहेत.
पार्श्वभूमी
Raj Thackeray Aurangabad Rally Sabha Live : मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे. सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या दौऱ्याची आखणी करण्यात आलीय. आणि औरंगाबादच्या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला आहे. पुणे ते औरंगाबाद प्रवासात राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जाणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेचं काऊंटडाऊन सुरु
राज ठाकरे यांच्या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची उद्या सभा होतेय. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागलीय.
राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी
औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पार पडणार आहेत. राजमहाल इथं १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत हे विधी पार पडतील. शेकडो गुरुजी राज ठाकरे यांना शुभ आशीर्वाद देतील. त्यानंतर राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होतील. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही नेते औरंगाबादच्या दिशेने निघणार आहेत.
राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा असणार आहे. पुणे ते औरंगाबाद दरम्यान राज ठाकरे यांच्या जागोजागी स्वागताची तयारी मनसैनिकांनी केलीय. राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक टीझर मनसेनं प्रसिद्ध केलाय.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधी ठिकाणी जाऊन दर्शन घेणार
राज ठाकरे पुण्यातून निघाल्यानंतर जवळच असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधी ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुढे औरंगाबादकडे रवाना होतील. औरंगाबादच्या सभेआधी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाण्याचा निर्णय घेऊन राज यांनी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याची मागणी अनेक वर्षापासून होतेय. त्यावरून राजकारणही रंगलंय. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधल्या सभेत राज ठाकरे हा मुद्दा उपस्थित करणार का याचीही उत्सुकता आहे. राज यांच्या वढू दौऱ्याकडे त्यादृष्टीनं पाहिलं जातंय.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेमुळे मनसे विरुद्ध शिवसेना संघर्षाची झलकही पाहायला मिळतेय. हिंदुत्वावरून दोन्ही पक्षांत स्पर्धा सुरु झालीय. त्यामुळे मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून शिवसेनेला उत्तर दिलंय. खरे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत. औरंगाबादमधल्या 10 चौकांत मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून उत्तर दिलंय. विशेष म्हणजे राज ठाकरे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेणार आहेत. त्याच मैदानात लवकरच सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -