Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला... त्याच्यावर बोलणारे हे कोण? तर रायगडच्या पालकमंत्र्यांनी (आदिती तटकरे) ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही म्हणून असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे ते पाहुयात.
जिल्हा कुठला? छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा, रायगड! चित्रपट कुठला? छत्रपती संभाजी महाराजांवरचा! स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार? हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत, अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
नेमकं काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन खुर्ची मिळवलीस, पण विचारधारा सोडली. ह्यांचे प्रमुख हे गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले तिथ जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ. मात्र, त्यांचा डाव मी पलटवून टाकला. नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी सभागृहात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडलं नाही. त्यामुळे, माझ्यासोबत 60 लोक आले, हिंदुत्वाचं सरकार मी आणलं. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आले, असे म्हणत जनतेचा कौलही आमच्याच बाजुने असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले. एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि माफी मागू लागले मला वाचवा. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथ जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली, असा गौप्यस्फोटच एकनाथ शिंदेंनी भर सभागृहात केला.
महत्वाच्या बातम्या: