एक्स्प्लोर

Maratha Reservation:  मराठा समाजाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धसका, मंचर एसटी आगाराचा उद्घाटन सोहळा केला रद्द

Maratha Reservation:  मंचर एसटी आगाराचा 11 नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला  मंचर एसटी आगाराचा (Manchar ST Bus Stand) उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. मंटर एसटी आगाराचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या हस्ते 11 नोव्हेंबरला होणार होते. परंतु  नुकतीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंचर इथल्या एसटी आगाराच्या उद्घाटन सोहळ्याला आले तर आम्ही काळे झेंडे दाखवू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Reservation) वतीने देण्यात आला. त्यानंतर 11 नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंचर इथल्या एसटी आगाराच्या उद्घाटन सोहळ्याला आले तर आम्ही काळे झेंडे दाखवू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्तेच्या जोरावर कार्यक्रम घेऊन मराठा समाजाच्या भावना दुखवू नये अशा पद्धतीचा देखील इशारा देण्यात आला होता. 11 नोव्हेंबरला हा कार्यक्रम होणार होता  माञ आता हा  
कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे.

मंचरमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आल्यास मराठा क्रांती मोर्चा काळे झेंडे दाखवणार 

मंचर एसटी आगाराचे उद्घाटन होत आहे. याचा आनंदच आहे... पण जोपर्यंत मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर  मंत्री आणि खासदार यांनी तालुक्यात प्रवेश करू नये ही नम्र विनंती आहे.  कारण मराठा आंदोलनाच्या वेळी तालुक्यात एका ही नेत्याने  लक्ष दिले नाही.  एसटी आगाराचे उद्घाटन एखाद्या एसटी  कर्मचाऱ्यांच्या हस्ते घ्यावे  करावे. जर नेते आले तर मराठा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाला येणाऱ्या मान्यवरांचा काळे झेंडे दाखवून अपमान केला जाईल.  सत्तेच्या जोरावर कार्यक्रम घेऊन... मराठा समाजाच्या भावना दुखवू नये ही  विनंती आहे . एक मराठा....लाख मराठा.

राजकीय नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नाही

राज्यातले अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. तरीही मराठा समाजाची परिस्थिती नीट नाही. त्यांना मूलभूत गोष्टींसाठी भांडावं लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाच्या नेत्यांनी येऊ नये, असा आक्रमक पावित्रा मराठ्यांनी घेतला.  मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. राजकारण्यांना मतदानासाठी फक्त मराठा समाज दिसतो. त्यावेळी सगळे नेते मतदान मागण्यासाठी येत असतात. मात्र आता आरक्षण द्यायच्या वेळी सरकार कोणतीही ठाम भूमिका घेत नाही आहे. त्यासोबत कोणताही राजकीय पक्ष ठाम भूमिका घेत नाही. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळायला हवं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नाही अशी भूमीका मराठा समाजाने घेतली आहे.

हे ही वाचा :

तर ठरलं! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget