(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी
वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र मुख्य विश्वस्तांच्या नावाने आले आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिराला आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याने परळीमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र मुख्य विश्वस्तांच्या नावाने आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत त्यांना एक पत्र मिळालं आहे. पत्रामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देऊ असा मजकूर लिहलेला आहे.
मंदिराचे सचिव हे पत्र मंदिर सचिव देशमुख यांनी परळी शहर पोलिसांकडे दिले आहे. मंदिराला असे धमकीचे पत्र पहिल्यांदाच आले असे राजेश देशमुख यांनी सांगून याच्या चौकशीची मागणी शासनाकडे केली आहे. 20 वर्षापूर्वी मंदिर उडवण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली होती. त्यानंतर या मंदिरात एस. पी .बीडने एक चारचा पोलिस गार्ड दिलेला आहे. शुक्रवारी आलेले पत्र कोणी पाठविले? का पाठविले याची चौकशी व्हायला हवी, कडक पोलिस सुरक्षा द्यावी अशी मागणी राजेश देशमख यांनी एका पत्राद्वारे पोलीसांकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी चालू आहे . गुन्ह्याची नोंद परळी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :