(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Weather : राज्यात पुढील 2-3 दिवस 'या' भागात पावसाची शक्यता, पुणे हवामान विभागाची माहिती, सविस्तर जाणून घ्या
Maharashtra Weather Update : आज विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोबत वादळी वारे 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणार असल्याचे देखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटलंय.
Maharashtra Weather : पुढील दोन दिवस राज्यात पावसाची ( Maharashtra Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाने याबाबत माहिती दिली असून, आजपासून दोन ते तीन दिवस म्हणजेच 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे असं म्हटंलय
राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या X अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्याची शक्यता आहे.
9th Feb: 10,11 फेब्रुवारी रोजी विदर्भा आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 9, 2024
Possibility of thunderstorms with light to mod rainfall, lightning in parts of Vidarbha & adj areas of Marathwada on 10 & 11 Feb at isol places pic.twitter.com/opJw0F0tA2
हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार
डॉ. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, आज विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोबत वादळी वारे 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणार असल्याचे देखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटलंय. मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि परभणी येथे वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शनिवारी गडगडाटी वादळांवर सोबत विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोबत वादळी वारे वेग 30-40 किमी प्रति तास जालना , हिंगोली आणि परभणी जिल्हे येथे घडण्याची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 9, 2024
IMD
देशातील हवामानाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे राज्यातील किमान व कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. देशाची स्थिती पाहता पुन्हा एकदा हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेची थंडी आणि दिवसा कडक ऊन असा काहीसा अंदाज आहे. थंडीची लाट कायम असली तरी लोकांना थंडी कमी जाणवू लागली आहे. दरम्यान, हवामान खात्याचे म्हणणे आहे की मध्य भारतात 10 ते 13 फेब्रुवारी आणि पूर्व भारतात 13 ते 15 फेब्रुवारीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.