एक्स्प्लोर

Toll on ST Bus : सरकार एसटीला टोल माफी कधी देणार? महामंडळाला आर्थिक तुटीतून बाहेर काढण्यासाठी मागणी

ST Bus Toll : एसटी महामंडळाच्या बसेसना टोल माफी दिल्यास आर्थिक तुटीतून बाहेर येण्यास मोठा हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुंबई राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. टोल माफीच्या (Toll Free)  या मुद्यावरून आता एसटी बसेसना (ST Buses)  टोल माफी देण्याची मागणी केली जात आहे. एसटी महामंडळाच्या (MSRCT ST Bus) बसेसना टोल माफी दिल्यास आर्थिक तुटीतून बाहेर येण्यास मोठा हातभार लागेल असे महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यात टोलच्या मुद्यावरून बैठक झाली. मात्र, या बैठकीत एसटीकडून होत असलेल्या टोल वसुलीबाबत साधी चर्चादेखील न होणे ही दुर्देवी असल्याचेही त्यांनी म्हटले. 

एसटी  महामंडळाच्या साधारण 14 हजार ते 14,500  गाड्या प्रत्यक्ष  रस्त्यावर धावत आहेत. त्यातून दररोज 52 लाख प्रवासी आणि दररोज साधारण 60 ते 70  हजार फेऱ्या होत आहेत. रस्तावर प्रत्यक्ष धावणाऱ्या प्रत्येक गाडी मागे एसटीला टोल भरावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी सरासरी 162 ते 167 कोटी रुपये इतका टोल भरावा लागत असल्याकडे श्रीरंग बरगे यांनी लक्ष वेधले. 

विविध कारणांमुळे महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटीचा संचित तोटा 9000 कोटी रुपयांच्या घरात आहे. पुरवठादारांची आजही 850 कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. अशातच ज्येष्ठ नागरीक महिलांना शासनाने दिलेल्या प्रवासातील सवलतीमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या, व्यवस्थापनाच्या अथक प्रयत्नांमुळे महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचले आहे. आता मासिक तोटा कमी झाला असून मासिक तूट फक्त 24 कोटी रुपये इतकी खाली आली आहे. एसटीला टोल मधून मुक्ती दिल्यास महामंडळ नफ्याच्या एकदम जवळ पोहचू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  त्यामुळे साहजिकच राज्यातील गरीब प्रवासी जनतेला अजून चांगल्या सवलती देता येतील आणि दिलासा मिळू शकेल. या शिवाय महामंडळा समोरील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतील. त्यामुळे पुढील बैठकीत सरकारने एसटी बसला लागणाऱ्या टोल वसुली बाबतीत सुद्धा फेर विचार करून टोल मधून एसटीला  पूर्णतः मुक्ती द्यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. 

एसटी महामंडळ किती ठिकाणी टोल भरते?

एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षात जवळपास 1900 कोटी रुपयांचा टोल हा शासनाला दिला आहे. साधारण एका वर्षाला 160  ते 170 कोटी रुपये टोल एसटी महामंडळाला भरावा लागत आहे. त्यात सध्या महाराष्ट्राचे रस्ते विकास महामंडळाचे 5 टोल सुरू आहेत.  मेगा हायवेला दोन टोलनाके असून राष्ट्रीय महामंडळ प्राधिकरणाचे 56 टोलनाके आहेत. अशा एकूण 63 जुन्या टोल नाक्यांवर एसटीला टोल भरावा लागतो. 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे 27 आणि महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे 26 असे एकूण 53 टोल नाकेबंद झाले.  इतर 12 टोल काही कारणास्तव बंद झाले. असे एकूण 65 टोल नाके बंद झाले आहेत. हा हजारो कोटी रुपयांचा टोल शासनाने जर महामंडळाला माफ केला असता तर एसटी महामंडळाची वाईट परिस्थिती नसती असा दावा  एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या 10 नगरसेवकांकडून काल उद्धव ठाकरेंची भेट अन् आज देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेणार! चंद्रपुरात ठाकरे-वंचित कोणता मास्टरस्ट्रोक मारणार?
त्या 10 नगरसेवकांकडून काल उद्धव ठाकरेंची भेट अन् आज देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेणार! चंद्रपुरात ठाकरे-वंचित कोणता मास्टरस्ट्रोक मारणार?
Mumbai Crime Malad Railway station: मालाड स्टेशनवर ओंकारने पोटात चिमटा खुपसला, आलोक सिंहांच्या पत्नीचा वाढदिवस, डिनरला जायचा बेत, पण त्याआधीच आक्रित घडलं
मालाड स्टेशनवर ओंकारने पोटात चिमटा खुपसला, आलोक सिंहांच्या पत्नीचा वाढदिवस, डिनरला जायचा बेत, पण त्याआधीच आक्रित घडलं
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदेंनी 'तो' धोका ओळखला, मुंबईत शिंदे सेनेची स्वतंत्र गटनोंदणी करणार, भाजपसोबत संयुक्त गट न करण्यामागील नेमकं कारण काय?
एकनाथ शिंदेंनी 'तो' धोका ओळखला, मुंबईत शिंदे सेनेची स्वतंत्र गटनोंदणी करणार, भाजपसोबत संयुक्त गट न करण्यामागील नेमकं कारण काय?
Jaunpur News : डॉक्टर होण्यासाठी कायपण! अपंग कोट्यातून MBBS करण्यासाठी सूरजनं स्वतःचा पाय कापला; उत्तर प्रदेशच्या तरुणाचं धक्कादायक कृत्य
डॉक्टर होण्यासाठी कायपण! अपंग कोट्यातून MBBS करण्यासाठी सूरजनं स्वतःचा पाय कापला; उत्तर प्रदेशच्या तरुणाचं धक्कादायक कृत्य

व्हिडीओ

Devendra Fadnavis Republic Day : आपल्या देशाची वेगाने प्रगती, तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
Republic Day 2026 : कर्तव्य पथावरची परेड सकाळी 10.30 वाजता सुरु होणार
Mumbai Crime Special Report : लोकलमधील वादानंतर प्राध्यापकाची हत्या, CCTV च्या आधारे आरोपीला बेड्या
Mumbai Local Crimeलोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्राध्यापकाची हत्या
Padma Awards 2026 : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्या 10 नगरसेवकांकडून काल उद्धव ठाकरेंची भेट अन् आज देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेणार! चंद्रपुरात ठाकरे-वंचित कोणता मास्टरस्ट्रोक मारणार?
त्या 10 नगरसेवकांकडून काल उद्धव ठाकरेंची भेट अन् आज देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेणार! चंद्रपुरात ठाकरे-वंचित कोणता मास्टरस्ट्रोक मारणार?
Mumbai Crime Malad Railway station: मालाड स्टेशनवर ओंकारने पोटात चिमटा खुपसला, आलोक सिंहांच्या पत्नीचा वाढदिवस, डिनरला जायचा बेत, पण त्याआधीच आक्रित घडलं
मालाड स्टेशनवर ओंकारने पोटात चिमटा खुपसला, आलोक सिंहांच्या पत्नीचा वाढदिवस, डिनरला जायचा बेत, पण त्याआधीच आक्रित घडलं
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदेंनी 'तो' धोका ओळखला, मुंबईत शिंदे सेनेची स्वतंत्र गटनोंदणी करणार, भाजपसोबत संयुक्त गट न करण्यामागील नेमकं कारण काय?
एकनाथ शिंदेंनी 'तो' धोका ओळखला, मुंबईत शिंदे सेनेची स्वतंत्र गटनोंदणी करणार, भाजपसोबत संयुक्त गट न करण्यामागील नेमकं कारण काय?
Jaunpur News : डॉक्टर होण्यासाठी कायपण! अपंग कोट्यातून MBBS करण्यासाठी सूरजनं स्वतःचा पाय कापला; उत्तर प्रदेशच्या तरुणाचं धक्कादायक कृत्य
डॉक्टर होण्यासाठी कायपण! अपंग कोट्यातून MBBS करण्यासाठी सूरजनं स्वतःचा पाय कापला; उत्तर प्रदेशच्या तरुणाचं धक्कादायक कृत्य
MHADA home lottery 2026 Mumbai: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! मार्चमध्ये म्हाडाची मुंबईतील 3000 घरांसाठी लॉटरी, कुठे-कुठे घरं?
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! मार्चमध्ये म्हाडाची मुंबईतील 3000 घरांसाठी लॉटरी, कुठे-कुठे घरं?
Mumbai Crime News: मालाडनंतर भांडूपमध्ये भयंकर घटना, भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; मुंबई पुन्हा हादरली!
मालाडनंतर भांडूपमध्ये भयंकर घटना, भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; मुंबई पुन्हा हादरली!
Republic Day 2026 Pandhapur: प्रजासत्ताक दिनी विठ्ठल मंदिरात आकर्षक तिरंगी फुलांची आरास; श्री विठुराया अन् रुक्मिणीच्या गळ्यातही तिरंगी फुलांच्या माळा
प्रजासत्ताक दिनी विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास; श्री विठुराया अन् रुक्मिणीच्या गळ्यातही तिरंगी फुलांच्या माळा
Satara Crime: मोठी बातमी! कोंबड्याच्या शेडमधून 55 कोटींच्या ड्रग्जसह हजारो कोटींचा कच्चा माल जप्त; कराडच्या पाचपुतेवाडीत DRI पथकाची कारवाई
मोठी बातमी! कोंबड्याच्या शेडमधून 55 कोटींच्या ड्रग्जसह हजारो कोटींचा कच्चा माल जप्त; कराडच्या पाचपुतेवाडीत DRI पथकाची कारवाई
Embed widget