एक्स्प्लोर

मशिदींवरील भोंगे हटविण्याचा इशारा ते शरद पवारांवर निशाणा, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

राज ठाकरे यांनी या सभेत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे ते शरद पवारांवर निशाणा साधला आहे.  राज ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्द्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

औंरगाबाद  : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज औरंगाबाद येथे गर्जना झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात त्यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, यांच्यावर सडकून टीका केली.  एकंदर राज ठाकरेंनी आपल्या भाषणात  राष्ट्रवादीला टार्गेट केलं.   राज ठाकरे यांनी या सभेत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे.  राज ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्द्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही

शासनाला नम्र विनंती आहे. 4 तारखेपासून ऐकणार नाही. हिंदू बांधवांना विनंती आहे. तिथे दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही. विनंती करून समजणार नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही. सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्यांनंतर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ही दाखवायची वेळ आली आहे.  मागचा पुढचा विचार करू नका, भोंगे उतरत नाही तोपर्यंत शांत बसणार आहे.  सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्यांनंतर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ही दाखवायची वेळ आली आहे.  मागचा पुढचा विचार करू नका, भोंगे उतरत नाही तोपर्यंत शांत बसणार आहे.  सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्यांनंतर महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद दाखवण्याची वेळ आली आहे.   4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही.  4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.

मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाही. 

लाऊडस्पीकरचा हा मुद्दा जुना आहे.  माझ्याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे. मी मशिदीवरच्या भोंग्याला हनुमान चालीसाचा फक्त त्याला पर्याय दिला आहे.  मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाही. लाऊड स्पीकर या विषयाला धार्मिक रंग देणार असेल तर आम्ही देखील धर्माने उत्तर देऊ. आम्हाला इच्छा नसताना टोकाची भूमीका घ्यायला लावू नको. सर्व भोंगे हे अनाधिकृत आहेत. यूपीत भोंगे उतरले मग महाराष्ट्रात का नाही?

पवारांनी जेम्स लेनवरुन बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला

पवारांनी जेम्स लेनवरुन बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य केले आहे. ज्या जेम्स लेनवरून 10 -15 वर्ष राजकारण यांनी केलं, तो म्हटला की मी कधीच पुरंदरेंना भेटलो नाही.  तुमची केंद्रात सत्ता होती तर का नाही आणला जेम्स लेनला महाराष्ट्रात असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. 

शरद पवार नास्तिक असल्याची कबुली कन्येने लोकसभेत  दिली 

Raj Thackeray on Sharad Pawar : दोन भाषणे झाली आणि सर्व फडफडायला लागले. जातीजातीमध्ये तणाव निर्माण करतात त्यामुळे तेढ निर्माण होत आहेत. शरद पवारांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला का?  असा सवाल राज ठाकरेंनी केला. पुढे राज ठाकरे म्हणाले, शरद पवार नास्तिक आहे हे म्हटल्यावर त्यांना झोंबले. त्यानंतर देवाचे, पूजेचे फोटो बाहेर काढले. हे नाटक आहे.  परंतु शरद पवारांची कन्येने स्वत: लोकसभेत याची कबुली दिली आहे. 

 शरद पवारांना हिंदू शब्दाची अॅलर्जी

राजकीय स्वार्थासाठी वाद उकरून काढण्यात आले आहे.  पवार साहेबांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे पण त्याआधी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मी कोणतीही जात मानत आहे. अठरा पगड जातीमध्ये विष तुम्ही कालवले. हे विष आता शाळा- कॉलेजांमध्ये पोहचले आहे.  उदात्त विचार देणारा महाराष्ट्र हा  जातीमध्ये सडतोय. मी कोणत्याही जात मानत नाही. 

राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार 

माझ्या पुढच्या सभा संपूर्ण मराठवाड्यात होणार. तसेच विदर्भात ही जाणार, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात ही जाणार, पश्चिम महारष्ट्रात ही जाणार. राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार. 

जो इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला

1 मे साजरा करताना आपल्याला महाराष्ट्र समजून घेण्याची गरज आहे. जो जो समाज इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला आहे. त्याच्या पायाखालची जमीन सटकली आहे. म्हणून थोडासा इतिहास आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आपण कोण आहोत. आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण मराठी आहोत. 

स्वाभिमानाने कसं जगायचे हे आमच्या राजानं शिकवले

छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे.  स्वाभिमानाने कसं जगायचे हे आमच्या राजानं शिकवले आहे. केवळ 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी भव्य काम केले. 

संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास विसरलो

आज संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास विसरलो. आम्ही महापुरुषांच्या जन्मतिथी आणि पुण्यतिथी साजरी करत आहे. ज्या दिवशी या समाजाच्या अंगात शिवाजी येईल तेव्हा संपूर्ण जग पांदक्रांत करता येईल , असे आंबेडकर म्हणाले  

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget