पदाधिकारीच उमेदवारीचा निर्णय घेतील, जयंत पाटलांनी सांगितला आगामी निवडणुकांसाठीचा प्लॅन
महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींत्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Jayant Patil : आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींत्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आगामी निवडणुकीत जिल्हाध्यक्ष, महापालिकेचे अध्यक्ष आणि पक्षाचे प्रमुख नेते सांगतील त्यांनाच उमेदवारी देऊ असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत काही आयात उमेदवारांना संधी दिली, त्यातील काही उमेदवार निवडणुका संपल्यानंतर जसे आले तसे निघून गेल्याचे पाटील म्हणाले.
पदाधिकारीच उमेदवारीचा निर्णय घेतील
आगामी निवडणुकीत पुन्हा हे होणार नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या मासिकात पदाधिकारीच उमेदवारीचा निर्णय घेतील अस आश्वासन या लेखात जयंत पाटील यांनी दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या चर्चेमुळे काही जिल्ह्यात योग्य उमेदवार देता न आल्याची खंत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत जरी पक्ष फुटलेला असला तरी त्या पक्षाला जागा सोडायची असं ठरलं असल्यामुळं नुकसान झाल्याची जयंत पाटील यांनी या लेखातून कबुली दिली आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता
राज्य सरकारनं मंगळवारी (ता.10) महापालिका,नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. या महापालिका अ, ब आणि क वर्गातील आहेत. सरकारनं प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिलेल्या महापालिकांमध्ये मुंबई,ठाणे,नवी मुंबई,वसई विरार,पुणे,पिंपरी चिंचवड,छत्रपती संभाजीनगर, नागपूर,नाशिक आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी झालेल्या सुनावणीवेळी अडीच- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रलंबित या सर्व निवडणुका ऑक्टोबरपर्यंत घेण्याचा आयोगाच्या उद्देशानं आता सरकारनं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यात घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली होती. याचवेळी त्यांनी स्थानिकच्या निवडणुका येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातील,असेही म्हटलं होतं. त्यामुळं आता पुढच्या चार महिन्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्या दृष्टीने सध्या सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. सभा, दौरे, चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
























